
गडचिरोली
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्ष सत्तेत आला.अजीत पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले.लोकसभेत त्यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.पण विधानसभा निवडणुकीत पक्षाने मोठे यश मिळविले.आता पक्ष विस्ताराकरिता पक्षप्रमुख अजीत पवारांनी संघठनबांधणीला सुरवात केली आहे.याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी तनुश्री आत्राम यांची निवड करण्यात आली आहे.तनुश्री आत्राम या माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघात आत्राम कुटुंबिय आमनेसामने होते.धर्मरावबाबा आत्राम हे अजीत पवार गटाकडून तर त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटाकडून निवडणुकीला सामोरे गेल्या. अम्ब्रीश आत्राम यांनीही या निवडणुकीत कंबर कसली होती.दरम्यान अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांनीच विजयश्री मिळविली.
निवडणुकीदरम्यान धर्मरावबाबा आत्राम व त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांच्यात मोठा शाब्दिक वाद रंगला होता.अशावेळी त्यांची दुसरी कन्या तनुश्री आत्राम या आपल्या वडिलांसोबत खंबीरपणे उभ्या होत्या.निवडणुकीत त्यांनी सक्रिय भुमीका बजावली.तनुश्री आत्राम या गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य आहेत.आता त्यांची राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.पक्षाचे अध्यक्ष अजीत पवार यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे प्रांताध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी त्यांची निवड केली आहे.


