
चंद्रपूर:-
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही.अलीकडे राजकीय पक्षबदली हा काही औत्स्युक्याचा विषय राहिला नाही.पण काही तासातच भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणा-या एका राजकीय घटनाक्रमाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.पक्ष बदलविणारे दोघे जण बाजार समितीचे संचालक आहेत.राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे.
राज्याचे माजी वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आहे.या मतदारसंघात पोंभूर्णा तालुक्याचाही समावेश आहे.राजकीय दृष्टया या तालुक्याला मोठे महत्व आहे.यामुळे स्वतः सुधीर मुनगंटीवार यांचे या तालुक्याकडे विशेष लक्ष असते.त्यांच्याच नेतृत्वात पोंभुर्ण्यातील अनेक राजकीय शक्तीकेंद्र भाजपच्या हातात आहे.पण सुरवातीला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर काॅग्रेस व शिवसेनेने सत्ता मिळविली होती.दस्तुरखुद मुनगंटीवारांच्या मतदारसंघातील बाजार समितीवर विरोधकांची सत्ता आल्याची खदखद भाजपाला होती.अनं यातुनच मग राजकीय खेळी खेळल्या गेली.काॅग्रेसचे रवींद्र मरपल्लीवार हे बाजार समितीचे सभापती होते.दरम्यानच्या काळात रवींद्र मरपल्लीवार यांनी काॅग्रेसला रामराम ठोकला व सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपत प्रवेश घेतला.यांनतही ते सभापतीपदावरच कायम होते.या मुदयावरून दरम्यानच्या काळात बरेच राजकीय रणकंदन माजले होते.
22 मार्च रोज शनिवारला सभापती रवींद्र मरपल्लीवार यांनी अशोक साखलवार व प्रफुल लांडे या दोन संचालकांना सोबत घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यंाचे कार्यालय गाठले.मोठया थाटामाटात पक्षाचा दुपटटा टाकून मुनगंटीवारांनी त्यांना पक्षप्रवेश दिला.पण 23 मार्च रोजी एक वेगळीच बातमी आली.हे दोघेही संचालक जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या निवासस्थानी पोहचले.अनं मग काॅग्रेसचा दुपटटा टाकून त्यांची घरवापसी करण्यात आली.दरम्यान आता या चोवीस तासात पटलीच्या राजकीय बातमीची जोरात चर्चा सुरू आहे.बाजार समितीच्या काही मुदयावर आम्ही सभापतीसोबत आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेलो होतो.मात्र आमची दिशाभूल करून भाजपत प्रवेश घडवून आणला गेल्याची प्रतिक्रीया आता हे दोन्ही संचालक देत आहेत.
धुसफुस
पोंभुर्णा तालुका भाजपात दोन गट आहेत.एकीकडे काॅग्रेसमधून भाजपत प्रवेश घेतल्यानंतर रवींद्र मरपल्लीवार यांचे सभापतीपद कायम ठेवण्यात आले.यातुनच भाजपची सत्ता आल्यानंतर सुध्दा बाजार समितीच्या विविध पदांच्या भरतीप्रक्रियेवर स्थगिती आणली होती.आता पुन्हा या बाजार समितीत काय काय घडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.


