Saturday, October 10, 2026

‘अंधार’ “सरू दे” …’उजेड’ “पडु दे”……!      

मानवी जिवन खुपच सुंदर आहे.इथे आंनद आहे.सोबत दुखः देखिल.आयुष्यात विविधांग दाखविणारी हि ”जिंदगी” अजबच आहे ना “दोस्त”हो…...!

पण शेवटी समाधान मानण्यातच सार काही.मनासारख काहीच होत नाही.पण खुप काही होऊनही जात.काही मिनीटाच जिवन मिळालेला फुलपाखरू आपले एक एक क्षण अतिशय आनंदाने जगतोय .इतरांनाही प्रसन्नतेची अनुभूती देतो.मोरिणीचा पसारा फुलविणारा डान्स संपूर्ण जंगलाला नवी उमेद देउन जातो.नदीच्या निर्मळ पाण्यात इकडून तिकडे भटकणारे लहानलहानचे मासे,आपल्या पिल्लांना जन्म देण्याची वेळ आली कि,अलगद शोधाशोध करून घरट बांधण्यासाठी अतिशय प्रभावी नियोजन करणारी चिमणी.आकाशात उंच भरारी घेत नव्या आकांक्षेची पदोनपदी आशावाद भरणारे पक्षी.पेरूचा अतिशय निरखून आंनद घेणारे स्मार्ट पोपट.आपल्या कुहु कुहु ने अनेकांना संगीताची गोडी लावणारी कोकिळा.अनं निसर्गातील असे अगणित घटक जे आपलं आयुष्य बिनधास्त जगतात.स्वतः आंनदी राहतात अनं दुस-यांनाही आंनद देतात.

पण याउलट पृृथ्वीवरील सर्वात बुध्दीमान समजला जाणारा माणूस नावाचा प्राणी मात्र सातत्याने दुखाःतच जगतो.उभ्या आयुष्यात त्यांच्या वाटयाला समाधानाचे फारच कमी क्षण येतात.अर्थात हि माणवाचीच करणी.वाढलेल्या गरजा.मोठमोठया आकांक्षाच ओझ.पुढे जाण्याची वृत्ती.आकस,अहंकार,कुत्सितपणा.अनं तेवढाच व्देष.असं असल तरी मानवी जातीतही प्रेमळ लोकांची काही कमी नाही.अनं याच मानवातील प्रजातीमुळे थोडयाफार अपेक्षा अजुनही जिवंत आहेत.
दिस येतील दिस जातील…तारखाही बदलतील.पण ख-या अर्थाने नवा दृष्टीकोन मानवी जिवनाला आंनदाचे तरंग देउ शकतो.सकारात्मकता,आत्मविश्वास,संवेदनशिलता,प्रेमळ भावना,करूणा,परिवर्तनता असे विविध आयुध…जे आपल्या सगळयात आहेतच.त्यांना “फुल रिचार्ज” करावच लागेल.

‘अंधार’ “सरू दे” …’उजेड’ “पडु दे”……!.या ओळीसंह आपण सर्व मान्यवरांना नूतन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा…….!

आपला
संदीप रायपुरे
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!