Sunday, June 28, 2026
spot_img

माजी आ. सुभाष धोटे यांना पुन्हा मिळाली नेतृत्वाची संधी

चंद्रपूर 
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,काँग्रेसचे जेष्ठ नेते,यांना पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्याच्या कॉँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करीत नेतृत्वाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनात्मक रचनेत करण्यात आलेल्या फेरबदलांमध्ये चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार सुभाष धोटे यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेनंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले.त्यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे गोंडपिपरी पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीनिवास कंदनुरीवार व तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विपीन पेद्दूलवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे

संघटन सृजन अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांनी जिल्हानिहाय बैठका, संवाद व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केले होते. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांचा अंतिम निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटनेत सातत्याने सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणून सुभाष धोटे यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

 संघटन सृजन अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसची जुनी कार्यकारिणी तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी काही दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली. यावेळी प्रतिक्रिया देताना सुभाषभाऊ धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली, याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा मनापासून आभारी आहे. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत, गतिमान आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आगामी काळात युवक, महिला, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यात येईल. नवीन कार्यकारिणीत अनुभवी कार्यकर्त्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाईल.असे त्यांनी सांगितले.

आमचे मार्गदर्शक माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या तडफदार कामगिरीची दखल घेत त्यांना पुन्हा एकदा चंद्रपूर जिह्वा काँग्रेस कमिटीची महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.हि आमच्यासह हजारो कार्यकर्त्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.

श्रीनिवास कंदनुरीवार
माजी पं.स. सदस्य, गोंडपिपरी

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!