चंद्रपूर: –
गडचिरोली माजी आमदार डाॅ.नामदेव उसेंडी,डाॅ.कोडवते दाम्पत्यांनी काँग्रेसलासोडचिठठी दिली होती.आता चंद्रपुरातही ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामासत्र सुरू झालय.पक्षाचे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.आजा त्यांनी पक्षाकडे अधिकृत राजीनामा सादर केल्यानंतर लागलीच सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश घेतला.देवतळे हे विजय वडेट्टीवार यांचे समर्थक मानल्या जातात.
चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणुकीत काॅग्रेसच्या एका गटाने भाजपशी हातमिळवणी केली होती.यात विजय मिळविल्यानंतर भाजपचे देवराव भोंगळे व प्रकाश देवतळे या दोघांचा “सामुहिक डान्स” चांगलाच चर्चेत आला होता.यानंतर या प्रकाराची तक्रार झाल्यानंतर देवतळेंना आपले जिल्हाध्यक्षपद गमवावे लागले होते. आताही प्रकाश देवतळे यांनी वेगळी भूमीका घेतली होती.काँग्रेसने तेली समाजाला उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली होती.दरम्यान आज त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.अनं यानंतर थेट सुधीर मुनगंटीवार,आमदार भांगडिया यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश घेतला.गडचिरोली नंतर चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांचे समर्थक आता पक्ष सोडू लागले आहेत.



