चंद्रपूर:-
लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.यावेळी कुठल्याही परिस्थीतीत चारशे उमदेवार
निवडून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकल्प केला आहे.अशात स्वतः मोदींनी ज्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले.त्यांना एकतर पक्षात घेण्यात आले किंवा त्यांच्यासोबत युती करण्यात आली.दिल्ली पासून राज्यात सुरू झालेेले हे लोण आता चंद्रपुर या शेवटच्या लोकसभा मतदारसंघापर्यत पोहचले आहे.मध्यवर्ती बॅक घोटाळयातील आरोपी मनोहर पाउनकर आता भाजपवासी झाले आहेत.पाउनकर भाजपमध्ये जाताच मतदारसंघात एकच एक चर्चा सुरू झाली.भाजपचा ‘‘दिल्ली ते गल्ली’’ एक ही नारा,भष्ट्राचारीयोसे साथ हमारा……!असले बोल आता चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅकेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांच्यावर विविध आरोप करण्यात आले.यातून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.अदयापही हे प्रकरण सुरू आहे.आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून विविध पक्षातील नेत्यांचे इनकमिंग केल्या जात आहे.प्रकाश देवतळे नंतर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांना नुकताच भाजपत प्रवेश देण्यात आला.पाऊनकर भाजपत गेल्यानंतर आता विरोधकांनी त्यांच्यासह भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे.देशात ‘‘वांशिग पावडर’’ ची जाहिरात लोकप्रिय होत आहे.कितीही गुन्हे करा,आमच्याकडे या.आमच्या पावडरने तुमच्यावरील सगळे डाग धुतल्या जातील.असा विश्वास दिल्या जात आहे.अजीत पवार,छगन भुजबळांचे दाखले देत विरोधक तुटून पडले आहेत.आता मात्र दिल्लीतील हे लोण चंद्रपूर सारख्या शेवटच्या मतदारसंघापर्यत पोहचले आहे.पाऊनकरांच्या भाजपप्रवेशानंतर चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलय.निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणा-यांना व्यवस्थेत काहीच किंमत नसते.केवळ आपल्या स्वार्थापायी हे “पलटूरामा”ची भूमिका घेतात.या “पलटूरामां”ची आता काही खैर नसल्याचे बोलल्या जात आहे.


