Sunday, June 28, 2026
spot_img

काॅग्रेसच पंचर चाक विकासाच्या गाडीला लाऊ नका

चंद्रपूर:-
आपल मत हे पवित्र आहे.आपल्या मताचा वापर देशहितासाठी झाल पाहिजे,’देशी’साठी नव्हे.आम्ही जर निवडून आलो तर संधीच सोन करू,चंद्रपूर गडचिरोली जिल्हयाला विकासाच्या शिखरावर नेऊ काॅग्रेसच पंचर चाक आपल्या विकासाच्या गाडीला लाऊ नका असे आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केल. चंदपुरात आज सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासभेच आयोजन मोरवा विमानतळ परिसरात करण्यात आल यावेळी ते बोलत होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले,गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांची यावेळी उपस्थित होते.चंद्रपूर हि वाघांची भूमिका आहे.येथे पवित्र दिक्षाभूमीही आहे.या भूमीचा आवाज आपण दिल्लीत बुलंद करू.आपण मला निवडून दया मी आपल्या मतदारसंघाचा दहापटीने विकास करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.काॅग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत,माफियाला मत असे ते म्हणाले.काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांच डिपाजीत जप्त होईल असे म्हणाले होते.त्या विधानाचा मुनगंटीवारांनी चांगलाच समाचार घेतला.माझ्या प्र्रभागात जर राहूल गांधीनी पदयात्रा केली तरी त्याचा काही फायदा होणार नाही.जनता आता काॅग्रेसचे डिपाजीत जप्त करीत त्यांनी धोटेंवर टिकास्त्र सोडले.चंद्रपूर आर्णी वणी या लोकसभा मतदारसंघाचा सर्वागिण विकास करण्याच आपल स्वप्न आहे.ते आता तुम्हालाच साकार करायच आहे.गेल्या तिस वर्षात आपण केवळ विकासाचच राजकारण केल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आपणास बळकट करायचे आहेत.त्याकरिता चंद्रपूर व गडचिरोलीतून आम्हाला निवडून दया असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले यांनी आपल्या मार्गदर्शनातून सुधीर मुनगंटीवार याना निवडून देण्याचे आवाहन केले

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!