Sunday, October 11, 2026

अखेर ‘‘दिल’’जमाई….चंद्रपुरात पाण्याचा झाला ‘‘संगम’’ मुनगंटीवार,जोरगेवार आले एकत्र

चंद्रपूर :-
दहा वर्षाच्या मित्रत्वाचा विरह आज संपुष्टात आला.अनं चंद्रपुरात दिलजमाईचा एक अनोखा क्षण बघायला मिळाला.निमीत्त होत सुधीर मुनगंटीवार अनं किशोर जोरगेवार यांच्या एकत्र येण्याच….दोघांनीही दिलखुलासपणे आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.अनं उपस्थितांनाही त्यांच्यातील आपुलकीचा अनोखा संगम बघायला मिळाला.
राजकारणात कुणी कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो.पण काही असे नाते निर्माण होतात कि ते कधीही एकमेकांना दुर सारू शकत नाही.कधीकाळी सुधीर मुनगंटीवारांचे जवळचे,त्यांचे राईट हॅन्ड असणारे किशोर जोरगेवार यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.अनं दोघांचेही संबध ताणले गेले.सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले.अनं मागील विधानसभेच्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी अपक्षपणे लढत देत आमदारपदी विराजमान झाले.त्यांनी चंद्रपुरात विक्रमी मते घेत विजय मिळविण्याचा पराक्रम केला.

दरम्यानच्या काळात राज्यात महाविकास आघाडी निर्माण झाली.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.अडीच वर्षानंतर भाजपने तक्तापलट केला.एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना घेत भाजपला पाठिंबा दिला.थेट गुवाहाटी गाठली.याच गुवाहाटीत आमदार किशोर जोरगेवार हे देखिल दाखल झाले होते.एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीच सरकार आल.अनं जोरगेवारांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला.सुधीर मुनगंटीवार याच कार्यकाळात वन,सांस्कृतिक मंत्री झाले.पण एकाच छत्राखाली असूनदेखिल दशकाभरापासून ताणलेले संबध काही सुधारत नव्हते.

लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला.भाजपने चंद्रपुरातून हेविवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेेच्या रिंगणात उतरवल.अनं या लढतीकडे सा-यांचेच लक्ष लागल.काॅग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी त्यांच्यासमोर मोठ आव्हान उभ केल.लोकसभा मतदारसंघात चंद्रपूरची भूमिका हि अत्यंत महत्वाची आहे.अशात आमदार किशोर जोरगेवार हे कुणाला पाठिंबा देतात याबाबत कमालीचा सस्पेंस होता.प्रतिभा धानोरकरांनी त्यांची घेतलेली भेट,मुनगंटीवारांनी सांगितलेल्या स्वाभीमानाच्या गोष्टी यावरून जोरगेवार नेमके काय करणार हा प्रश्न यानिमीत्ताने समोर आला होता.दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता या चर्चांना पुर्णविराम मिळालाय.अनेक वर्षानंतर सुधीर मुनगंटीवार,किशोर जोगरेवार यांच्यात आज दिलजमाई झालीय.दोघांनीही आपल्या भावनिक भाषणांतून आपआपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.

मुनगंटीवार म्हणाले,पाण्याचा संगम झाला…..!

चंद्रपूरात आज यंग चांदा ब्रिगेड ची मेळावा झाला.यावेळी मार्गदर्शन करतांना सुधीर मुनगंटीवार यंानी आपल्या भावना व्यक्त केल्या.पाण्याला कितीही वेगळे करण्याचे प्रयत्न केले.तरी पाण्याचा संगम होण्यापासून कोणीही रोकू शकत नाही.महायुतीच्या संगमात यंग चांदा ब्रिगेड सहभागी झाल्याबददल त्यांनी आमदार किशोर जोरगेवार व त्यांच्या संपूर्ण टिमचे मनापासून आभार मानले.

मी शेवटच्या टप्प्यावर येणारा मॅच”विनर”…….जोरगेवार

अनेकांनी आपणास प्रश्न केला कि तुम्ही शेवटच्या दिवसात हि भूमिका घेतली.मी त्यांना सांगितल.हि निवडणूक क्रिकेटसारखी आहे.किके्रट सामन्यात अनेक खेळाडू असतात.कॅप्टन निर्धारित करतो कि सुरवातीला कोण बॅटिंग करेल अनं कोण विनींग शाॅट मारेल.आमचे कॅप्टन अर्थात सुधीर मुनंगटीवार यांनी आपणाला विनिंग शाॅट मारण्यासाठी पाठवल आहे.मुनगंटीवारांच्या विजयासाठी आपण पूर्ण शक्तीनीशी मैदानात उतरलोे असून ते लाखोंच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!