चंद्रपूर:-
राज्यात लवकरच स्मार्ट प्रीपेड मीटर योजना कार्यान्वीत करण्यासाठी अखेरच्या टप्प्यात काम सुरू होते.पण हि योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी मारक असल्याच्या तक्रारी आल्या.अनेकांनी याचा विरोध केला.दरम्यान जनभावना लक्षात घेता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमीका मांडली.यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.यानंतर आता राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.आता केवळ शासकिय कार्यालयातच स्मार्ट प्रीपेड चे मीटर लावण्यात येणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना ना. मुनगंटीवार म्हणाले, वीज वितरणाच्या दरम्यान संभावित तोटा (डिस्ट्रिब्युशन लॉस) कमी व्हावा किंवा रोखता यावा या उद्देशाने तसेच वीज वितरण कंपन्यांचे गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढावे, मानवी चुका कमी व्हाव्यात, जलद ग्राहक सेवा मिळावी तसेच उत्तम सुविधा ग्राहकांना मिळाव्यात या उद्देशाने स्मार्ट मीटरची योजना जुलै २०२० मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आली होती. परंतु, स्मार्ट मीटर बसाविण्यासंदर्भात घरगुती ग्राहकांमध्ये असलेला रोष व अस्वस्थता बघून उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचे केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.


