चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हयाच्या सिमावर्ती भागात तस्करीचे प्रमाण वाढले आहे.विविध अवैध धंदयांना ऊत आले आहे.गोळबारीच्या घटनांनी पोलीसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.अशात पोलीस कारवायांचे प्रमाण कमी होत असल्याची बोंबाबोब होत आहे. चंद्रपूर व तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यात ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी कारवायांचा धडाका लावला आहे.आज 10 जुलैै रोजी गोंडपिपरीत त्यांनी गांजाची तस्करी करणा-यावर कार्यवाही करित एकून आठ लाख रूपयाचा मुददेमाल जप्त केला.याप्रकरणी बल्लारपूर येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे.या कारवाईने गांजातस्कराचे धाबे दणाणले आहेत.
गोंडपिपरीत ठाणेदार रमेश हत्तीगोटे,पीएसआय कराडे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री गस्त सुरु होती यावेळी संशयित वाहन भरधाव वेगात जातांना आढळून आले.या वाहनाला पकडून तपासणी केली असता त्यात तब्बल १ लाख रुपये किमतीचा ९ किलो ७७० ग्राम गांजा आढळून आला. दरम्यान याप्रकरणी बल्लारपूर येथील शेरखान पठाण याला अटक करण्यात आली आहे. गांजा व वाहन असा ८ लक्ष रुपयांचा माल जप्त केला गेला. रमेश हत्तीगोटे हे गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आहेत. गोंडपिपरीत रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक कारवाया केल्या आहेत. दारूसोबतच या परिसरात गांजाचे व्यसन केल्या जाते. अनेक कालेजकुमार या भानगडीत पडले आहेत.यामुळे समाजस्वास्थ बिघडत आहे. यामुळे हत्तीगोटे यांनी गांजातस्करावर कार्यवाहीचा मुसका आवळला आहे.
ठाणेदार हत्तीगोटेंचा गांजातस्करांना दणका, मध्यरात्री केली कारवाई
RELATED ARTICLES



