चंद्रपूर :-
कोरपणा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली.या घटनेनंतर समाजात तिव्र संताप आहे.बारा वर्षाच्या मुलीवर असा अत्याचार करणा-या आरोपीला थेट फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी होत आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.जो जो या प्रकरणात सहभागी आहे.त्याचा तातडीने तपास करा.दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.त्यासाठी आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुददा मांडू.सदर प्रकरणात आरोपी हा एका राजकीय पक्षाशी संबधीत आहे.त्यामुळे कुठलाही दबाव न ठेवता चौकशी व कार्यवाही व्हावी यात पुन्हा काही राजकीय मंडळीचा सहभाग आहे का याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले.महिलांनी आपणाकडे तक्रार केली कि या शाळेत मुलींना गुंगीचे औषध दिले जात होते.हा अतिशय गंभीर प्रकार आहे.याप्रकरणी कुठलीही हयगय खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
कोरपणा तालुक्यातील इमीनन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच अत्याचाराचे मोठे प्रकरण समोर आले होते.घटनेतील आरोपी अमोल लोडे हा काॅग्रेसचा शहर अध्यक्ष होता.हे प्रकरण होताच तो पसार झाला.आपले राजकीय वजन वाफरून तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.
राज्यात आधीच अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे.बदलापूरच्या घटनेवरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे.अशात आता कोरपणा येथील हि घटना अतिसंतापदायक आहे.अशात आरोपी हा काँग्रेसचा पदाधिकारी होता.पण हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे.अशा स्थितीत ताबडतोब कारवाई होणे गरजेचे असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.या संपूर्ण प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.याप्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश यावेळी मुनगंटीवारांनी दिले.


