चंद्रपूर:-
कडू कार-याला तुपात तळा किंवा साखरेत घोळा ते कडूच असते.काॅग्रेस कडू कारले आहे.ते बदलू शकत नाही.त्यांच्या कडूपणामूळे लोकांचे समर्थन काॅग्रेस मिळवू शकत नसल्याची टिका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरातील जाहीर सभेत बोलतांना केली होती.त्यांचे हे विधान समोर येताच नेटक-यांनी त्यांच्या विधानाची चांगलीच खिल्ली उडवली आहे.काॅग्रेस जर ‘‘कडू’’ कारले आहे तर हे कारले भाजपात जाताच ‘‘गोड’’ कशी होतात असा टोला नेटक-यांनी हाणला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली.या सभेत त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला.काॅग्रेसला त्यांनी कडू कारल्याची उपमा दिली.ज्याप्रमाणे कारले तुपात तळा किंवा साखरेत घोळा ते कडूच राहतात.काॅग्रेस हे कारले आहे.असे ते म्हणाले होते.आता त्यांच्या विधानाला घेत समाजमाध्यमातून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.कारले कडू असते.काॅग्रेस कारले आहे.मग त्याच कडू कारल्याच्या बिया भाजपमध्ये जाताच त्या “गोड” कशा होतात असा सवाल विचारत नेटकऱ्यांनी मोदींच्या विधानाची खिल्ली उडवली.
धानोरकर म्हणाल्या,मोदींच्या सभेन काही फरक पडणार नाही
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी दस्तूरखूद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंदपुरात आले होते.त्यांच्या सभेनंतर भाजपचे पारडे जड होणार असे भाजप वर्तुळात बोलल्या गेले.पण काॅग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मात्र मोदींची सभा झाली तरी त्यांचा काही एक फायदा होणार नसल्याचे म्हटले आहे.भाजपच्या हुकुमशाहीला जनता कंटाळली आहे.चंद्रपुरातील मतदार सुज्ञ आहेत.ते योग्य निर्णय घेतील.कुणाला निवडून पाठवायच आहे हे जनतेला चांगलच माहित आहे.आमच्या दृष्टीने हि लढत काही टफ नसल्याचेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.पराभवाची भीती असल्याने या मतदारसंघात पंतप्रधानांना आणावे लागले असा टोला धानोरकरांनी हाणला.


