Sunday, October 11, 2026

दहा हजाराची पूडी..”एकदम भारी”..का होतोय वायरल 0.1चा कोडमार्क

चंद्रपूर
0.1हा कोडमार्क अनं दहा हजाराची पूडी कुणाकुणाला मिळाली हो. हा नारा देत गोंडपिपरी च्या सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांना सध्या सोशल मीडियातून चांगलेच धारेवर धरल्या जात आहे.यामुळं गोंडपिपरीच्या नगरपंचायतीत नेमक चाललंय तरी काय हा प्रश्न विचारला जात आहे. या मुद्यावर आता नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांनी दणकून टीका करीत अनेकांवर निशाणा साधला आहे. “दहा हजाराची पूडी” एकदम “भारी” असे म्हणतं त्यांनी या विषयात अशी भर टाकली की आता याचीच चर्चा गोंडपिपरीच्या नगरपंचायत वर्तुळासह राजकीय गोटात होऊ लागली आहे.

गोंडपिपरी नगराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. दहा कोटी रुपयाच्या या कामाचे कंत्राटही देण्यात आले. वर्ष लोटले,चार पाच वर्षाचा कालावधीही झाला पण योजना सुरु होऊ शकली नाही. आजही नगरातील शेकडो कुटुंबियांकडे नळाची व्यवस्था नाही. अनेक गरिब कुटुंबियांना याची मोठीच झळ सहन करावी लागत आहे. पण येथील लोकप्रतिनिधीना त्यांच्याशी काही देणेघेणेच नाही की काय अशी स्थिती नळ योजनेसंदर्भात बघायला मिळाली.योजनेचे काम पूर्ण झाले नाही हा मुद्दा घेत हस्तांतरणाचा प्रश्न समोर आला.ठेकेदाराच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या गेले.एवढा मोठा कालावधी लोटून काम पूर्ण होऊ शकले नाही. यावरून ठेकेदार वादाच्या भोवऱ्यात सापडला. 2018 च्या योजनेला 2024 ला मुहूर्त मिळाला. दरम्यान नुकतीच या योजनेच्या हस्तांतरण प्रकियेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.अशातच आता दहा हजाराच्या पुडीचा मुद्दा समोर आल्यानंतर हा विषय अधिकच चर्चीला जात आहे.

एकीकडे योजना सुरु करण्याबाबत मंजुरी दिल्याने त्यासाठी नगरपंचायत च्या अध्यक्षा सविता कुळमेथे यांनी पत्रपरिषद घेतली. लवकरच सर्वाना नळ उपलब्ध होतील याबाबतची हमी दिली. तेव्हाच दुसरीकडे मात्र समाजमाध्यमातून दहा हजाराच्या पुडीचा मुद्दा समोर आला. काहींनी तर याला 0.1असा कोडमार्क देत लोकप्रतिनिधीना धारेवार घेतले.दहा हजाराची पूडी अनं 0.1ही नेमकी भानगड तरी काय आहे असा प्रश्न आता अनेक नगरवासियांना पडला आहे.सध्या गोंडपिपरी नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आहे.येत्या काही दिवसात अध्यक्षपदाचा कालावधी संपणार आहे.सत्ताधाऱ्यांपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे विरोधक सत्तापालट करण्यासाठी फिल्डिंग लावून बसले आहेत. येणाऱ्या दिवसात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी नगरपंचायतीची सत्ता आपल्याकडे असावी यासाठी ज्यांचात्यांचा प्रयत्न आहे.अशातच आता दहा कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना चर्चेचा विषय झाली आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!