Saturday, October 10, 2026

धर्मरावबाबांची दरियादिली…..असे काही केले कि,त्यांचीच होतेय आता चर्चा

गडचिरोली:-
राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते व राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे नेहमीच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात.पण आता यावेळी त्यांनी असे काही केले कि,आता पंचक्रोशीत त्यांच्या दरियादिलीबाबत बोलल्या जात आहे.गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथे लोहखनीजावर प्रकिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करावयाचा आहे.यासाठी जागेची अडचण आली.मग काय धर्मरावबाबांनी निर्णय घेतला.अनं क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या मालकीची तब्बल 250 एकर जागा दान दिली.
नक्षलग्रस्त अनं दुर्गम भाग अशी गडचिरोलीची ओळख राहिली आहे.पण आता या जिल्हयात विविध प्रकल्प येउ लागले आहेत.येत्या काळात गडचिरोली प्रकल्पांचा मोठा हब होणार आहे.गडचिरोलीतील सुरजागड येथे लोह खनीजाचा मोठा साठा आहे.येथील खाणीतून सध्या उत्खनन सुरू आहे.सुरजागड येथील लोह खनिजावर प्रक्रिया करण्यासाठी अहेरीत मोठा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे साधारणत दहा हजार तरूणांना कायम रोजगार मिळणार आहे.प्रकल्पाकरिता जेव्हा जागेची अडचण आली.अनं हा विषय मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मालकीची तब्बल 250 एकर जागा दान दिली आहेे.यामुळे हा प्रकल्प सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.येत्या 17 आॅगष्ट रोजी या प्रकल्पाचा भूमीपूजन होणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार,देवेंद्र फडणवीस,उदयोग मंत्री उदय सावंत यांच्यासह धर्मरावबाबा आत्राम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

गडचिरोली जिल्हयातील नागरिकांसाठी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार आहे.या माध्यमातून जवळपास दहा हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे.प्रकल्पाकरिता जेव्हा जागेची अडचण आली तेव्हा आपण 250 एकर जागा या प्रकल्पासाठी दान देण्याचा निर्णय घेतला
ना. धर्मरावबाबा आत्राम
अन्न व औषधी प्रशासनमंत्री महाराष्ट्र राज्य

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!