Sunday, June 28, 2026
spot_img

पक्षविरोधी काम करणा-यांना भाजपचा दणका…..करणार यादी तयार

 

चंद्रपूर
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.यात कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्यासाठी भाजप अलर्ट मोडवर आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत पराभव पत्करावा लागला होता.भाजपच्या अनेक मंत्र्यांचे या निवडणुकीत पाणीपत झाले.चंद्रपुरात तर सुधीर मुनगंटीवार यांनाही पराभवाचे तोंड बघावे लागले होते.पराभव झाला असला तरी मुनगंटीवारांनी आपल्या कामांचा झंझावात कायम ठेवला आहे.दरम्यान नागपूरात पार पडलेल्या भाजपच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षविरोधात काम करणा-यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी येत्या दोन दिवसात भाजपची तालुकानिहाय मंडळ कार्यकारिणी घोषित केली जाणार आहे.आता पक्षविरोधी काम करणा-यांची यादी तयार करण्यात येत असल्याने असे काम करणा-या “घरभेदयां”त कमालीची धडकी भरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीची जिल्हानिहाय बैठक पार पडली.बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.सदर बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर काय काय नियोजन करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच मतदारसंघाचा आढावा देखिल घेण्यात आला.यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांनी चंद्रपूर जिल्हयात अनेक वर्षापासून मंडळ कार्यकारिणी नसल्याचा मुद्दा समोर आणला.दरम्यान या विषयाला घेत तातडीने मंडळ कार्यकारिणी गठीत करण्याच्या सुचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.याचसोबत ज्यांनी ज्यांनी पक्षविरोधी काम केले.त्यांची यादी तयार करण्याबाबतचे आदेशही सदर बैठकीत देण्यात आले.लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या काळात पक्षविरोधी चा मुददा ऐरणीवर आला होता.

सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवात अनेक कारणांसह “घरभेदंया”ची महत्वाची भूमिका राहिली होती.विजयानंतर काँग्रेसच्या खासदार प्रतीभा धानोरकर यांनी ज्यांनी ज्यांनी आपणास मदत केली त्यांचे त्यांचे आभार मानले होते.विशेष म्हणजे या विजयात योगदान दिल्याबददल त्यांनी कुणाचे नाव न घेता भाजप नेत्यांचे जाहिररित्या आभार मानले होते.आता अशा “घरभेदयां”ची यादी तयार करण्याचे आदेश दिल्या गेले आहेत.यामुळे असे काम करणा-यांत चांगलीच धडकी भरली आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!