चंद्रपूर:-
भाजप शिवसेनेची युती तुटल्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या निशान्यावर भाजपचे अनेक नेते राहिले आहेत.यात राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार अग्रक्रमावर आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त विधानांवर ठाकरे गटाने आक्रमक रूप घेतले होते.सामना मधून त्यांच्यावर कडा प्रहार करण्यात आला होता.मुनगंटीवारांना घेरण्यासाठी ठाकरे गटाकडून एकही संधी सोडली जात नाही.अशात आता सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्याच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठी थेट मातोश्रीवरून फिल्डींग लावली जात आहे कि काय असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याची विनंती मान्य करीत थेट मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ‘‘हा’’ म्हटले.अनं मग या कार्यकर्त्याने कामाचा झपाटाच लावला.
हे कार्यकर्ते कोणी दुसरे तिसरे नसून शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमूख संदीप गि-हे आहेत.मातोश्रीवरून परतल्यानंतर ते सध्या फुल फार्म मध्ये दिसत आहेत.सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत.आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रत्येकांची फिल्डींग सुरू आहे.सध्या राज्यात महाविकास आघाडी,महायूती हाच फार्मुला सुरू आहे.चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाच राहिला आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनु.जाती साठी राखीव झाल्यांनतर सुधीर मुनगंटीवार यांनी हा मतदारसंघ निवडला.येथून ते सलग तिनदा निवडून आले.यापुर्वी या मतदारसंघातून शोभाताई फडणवीस यांनी अनेकदा नेतृत्व केले.
भाजपला सोयीचा असलेल्या या मतदारसंघातील मतदारांची बदललेली मानसिकता अनेकांसाठी नवी उमेद ठरली.लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांना कमालीचा झटका बसला.
दरम्यान आता शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमूख संदीप गि-हे यांनी याच मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे.गेल्या ब-याच दिवसांपासून त्यांनी आपले मुख्यालय मुल मध्ये केले आहे.विधानसभा मतदारसंघातील तिनही तालुक्यात त्यांनी आपले कार्यालय उभारले आहे.पोभूर्णा तालुक्यातील त्यांचे निकटचे सहकारी त्यांच्यासाठी जिवाचे रान करण्यासाठी आतापासूनच तयार झाले आहेत.
काॅग्रेसमध्येही इच्छुकांची गर्दी
लोकसभा निवडणुकांच्या निकालाने कोमात गेलेल्या काॅग्रेसला जिवदान मिळाले.यामुळे आता काॅग्रेस पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी अनेकांनी लाबींग सुरू केले आहे.मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोष रावत,डाॅ.अभिलाषा गावतूरे,प्रकाश पाटील मारकवार यांची नाव यात आघाडीवर आहेत.
धोटेंचे विधान आघाडीसाठी अडचणीचे
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसला मोठा कौल मिळाला असून त्या जागा लढविण्यासंदर्भात सुतोवाच केले होते.त्यांच्या या भुमिकेनंतर महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत नाराजीचा सुर उमटला होता.तो अदयापही कायम आहे.



