Sunday, October 11, 2026

“हि” तर पितापुत्रीची “नौटंकी” कोण म्हणाल असं…..!

गडचिरोली

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होणार आहे.अशात आता अनेक नेत्यांना आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.महायुतीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश घेतला.यानंतर पितापुत्री आमने सामने राहणार असल्याचे स्पष्ट झाले.या मुद्द्यावर विविध चर्चा रंगल्या असतांना आता मात्र अहेरी विधानसभा मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम व त्यांच्या कन्येची हि मिलीभगत असल्याचे बोलल्या जात आहे. भाजप नेते माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सत्तेसाठी पितापुत्रीची हि सारी नौटंकी असल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार हमला केला आहे.

आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार आहोत.आपल्या कार्यकर्त्यांनी तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले आहे.तरी देखील आपण वाट बघू पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेते त्यावर आपली पूढील भूमिका असेल असे म्हणत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत सुतोवाच दिले आहेत.

गेल्या पाच वर्षात अहेरी विधानसभा मतदारसंघाचा विकास भकास झाला.याकाळात धर्मरावबाबा आत्राम यांना काहीच करता आले नाही.आता शेवटची निवडणूक आहे असे ते गेल्या विस वर्षापासून सांगत आहेत.पण सत्तेची लालसा त्यांना स्वत स्वस्थ बसू देत नाही.अहेरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे.लोकच त्यांना जागा दाखवित त्यांची शेवटची निवडणूक ठरवितील असे सांगत अम्ब्रीशराव आत्राम यांनी लोकांच्या आग्रहाखातर आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

अहेरी विधानसभेची उमेदवारी महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी पक्की आहे.अशात हि आमची हक्काची जागा असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते.यामुळे शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारीची मिळण्याची शक्यता आहे.अशा वेळी अम्ब्रीशराव आत्राम यांनी देखील निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने आता या मतदारसंघात घराण्याची लढत रंगतदार ठरणार आहे.

 काॅग्रेसची कोंडी
लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर गडचिरोलीत काॅग्रेसचे हौसले बुलंद होते.विधानसभा निवडणुकीत आपलाच विजय होईल याकरिता अनेक नेते कामाला लागले.लोकसभा निवडणुकीआधी आविस नेते अजय कंकडालवार यांनी काॅग्रेस मध्ये प्रवेश घेतला.आता विधानसभा निवडणुकीकरिता  मडावी या सेवानिवृत्त वनअधिका-यांना उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसने फिल्डींग लावली आहे.पण शरद पवार गट हि उमेदवारी सोडण्याची सुतरामही शक्यता नाही.अशा स्थितीत काॅग्रेसची या मतदारसंघात चांगलीच कोंडी होत आहे.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!