
चंद्रपूर
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशात अनेक पक्ष,त्यांचे नेते फुलटाईम सक्रिय झाले आहेत.अनु.जातीचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर जिल्यात भिमशक्ती संघटनेन अशी मागणी केली कि,त्याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.जिल्हयात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी महाविकास आघाडीने किमान दोन मतदारसंघात महिलांना उमेदवारी दयावी.अनं महिलाशक्तीचा सन्मान करावा.जिल्हयात अनेक ताकदवर महिला नेत्या आहेत.अशावेळी त्यांनाही संधी मिळायला हवी असे भिमशक्ती संघटनेचे जिल्हयाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी म्हटले आहे.यासंदर्भात त्यांनी भिमशक्ती संघटनेचे संस्थापक तथा जेष्ठ काॅग्रेस नेते खासदार चंद्रकांत हांडोरे यांना पत्र लिहीले आहे.संघटनेच्या नेत्या अपेक्षा पिंपळे यांनीही या मागणीला घेत आता कणखर भूमीका घेतली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.महाविकास आघाडी,महायुती अशी लढत होणार असतांना तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या वाटचालींना वेग आला आहे.वंचित बहूजन आघाडीने वेगळी भूमीका घेतली आहे.अशात येणा-या या निवडणुकीत निकाल काय असेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल होत.त्यामुळ त्यांच्या उत्साहाला पारावार उरला नाही.अनेक संस्थांच्या सर्व्ह मध्ये महाविकास आघाडीचच सरकार येईल अस सांगितल जात आहे.अशात महाविकास आघाडीतील घटकपक्ष आपल्या पदरात जास्तीतजास्त जागा कशा पडतील याची व्युहरचना आखत आहेेत.
लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरात काॅग्रेसन दमदार कामगिरीचा परिचय दिला.प्रतीभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती करण्याचा काॅग्रेसचा प्रयत्न आहे.काॅग्रेस नेत्यांचे हौसले बुलंद झाले आहेत.एकएका विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी प्रचंड लाॅबींग सुरू आहे.अशात आता भिमशक्ती संघटनाही सक्रिय झाली आहे.
चंद्रपूरातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच भिमशक्ती संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या विदर्भ प्रांताध्यक्ष अपेक्षा पिंपळे यांच्या नेतृत्वात यावेळी मार्गदर्शन करण्यात आल.चंद्रपूर जिल्हयात सहा विधाानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी किमान दोन मतदारसंघात महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात यावी हा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,काॅग्रेसचे जेष्ठ नेते,राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्याकडे तो प्रस्ताव पाठविल्या गेला.आपल्या संघटनेच्या वतीने अशी वेगळी व रास्त मागणी समोर आल्यानंतर त्यांनी पदाधिका-यांचे कौतुक केले.हा प्रस्ताव आपण काॅग्रेसच्यंा पक्षश्रेष्ठीपूढे मांडू अशी ग्वाही त्यांनी दिली.चंद्रपूरात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे.येथील राजकीय गणीत बिघडविण्यात ताकद त्यांच्यात आहे.अशात या घटकांतील एका संघटनेच्या माध्यमातून समोर आलेल्या या मागणीची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे.भिमशक्ती संघटनेने कुठल्या विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी दयावी याबाबत स्पष्टता केली नसल्याने त्यांचे इरादे साफ असल्याचे स्पष्ट दिसत आहेे.


