
चंद्रपूर
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता विविध पक्ष सक्रिय झाले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे हौसले बुलंद असतांना महायुतीला राज्यात आपली सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे.महायुतीतील घटकपक्षात जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी फिल्डींग लावल्या जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विदर्भात पाहिजे तशी ताकद नाही.पण आता त्यांनी आपल संघटन वाढविण्यावर जोर दिला आहे.चंद्रपूरात शिंदे गटाच्या नेत्यांकडून अनेक पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत.आता तालुका प्रमुख म्हणून काम करणा-या महिला नेत्याला बल्लारपूर विधानसभा महिला आघाडीच्या पदावर जबाबदारी देण्यात आली आहे.कृष्णा सुरमवार यांची या पदावर वर्णी लागली आहे.
कृष्णा सुरमवार यांना लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत.शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती मतदारसंघात त्यांच्या मातोश्री शिवसैनिक होत्या.आईची मदत करतांना त्यांच्यातही राजकारणाशी आवड निर्माण झाली.गेल्या काही वर्षापासून त्यांनी शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची जबाबदारी पार पाडली.आता त्यांची बढती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आदेशाने तसेच शिवसेना महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभागाचे समन्वयक अॅड. वैजनाथ वाघमारे आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंद्रपूर निरीक्षक आमदार कृपाल तुमाने यांचे मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांनी मुंबई येथील हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे भवन येथे कृष्णा सुरमवार यांची शिवसेना महिला आघाडीच्या बल्लारपुर विधानसभा संघटीका पदी नियुक्ति पत्र देवून शिवसेना पक्ष संघटनेचा विस्तार करण्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मुंबई येथील बाळासाहेब ठाकरे भवनात शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी,अरविंद धिमान, दिपक कामतवार, राकेश राठोड, महेश डोंगे, विक्की राठोड, दिपक रेड्डी, नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, योगिता घोरुडे, महिला आघाडी वरोरा तालुका प्रमुख अल्काताई पचारे, योगेश म्यानेवार, विवेक दुर्गे, राधा कोल्हे, सौ. सविता तरारे, मंदाबाई धान्दे, अयान पठान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


