Sunday, October 11, 2026

बल्लारपूर मतदारसंघात काॅग्रेसच्याच उमेदवाराची प्रतीक्षा ….!

 

चंद्रपूर

बल्लारपूर ची उमेदवारी उबाठा ला जाणार,या जागेवरून खिचतान सुरू,शरद पवार गटही मागतोय बल्लारपूरची उमेदवारी. अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या,वाचल्या असतील.पण आता मात्र बल्लारपूर मतदारसंघावर शिवसेना उबाठा ने दावा सोडल्याची माहिती आहे.आता या मतदारसंघात महायुतीकडून भाजप विरूध्द महाविकास आघाडीच्या काॅग्रेसची थेट लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.पण सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात काॅग्रेस कुणाला मैदानात उतरविणार याबाबतची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यत शिगेला पोहचलीय.यांना उमदेवारी,त्यांना उमेदवारी अशा बातम्या पेरल्या जात आहेत.पण पक्षाकडून अजूनही यादीच जाहीर करण्यात आली नसल्याने ‘ते’ उमेदवार कोण असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारल्या जात आहे.

भाजपने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली.यात बल्लारपूर मतदारसंघातून राज्याचे वने,सांस्कृतिक,मत्स्यव्यवसाय सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी घोषीत झाली.आता महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याबाबतची उत्सुकता ताणल्या गेली आहे.काॅग्रेसकडून अनेक इच्छुकांची गर्दी आहे.जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,काॅग्रेस नेत्या डाॅ.अभीलाषा गावतूरे हे शेवटच्या टप्यात प्रमुख दावेदार आहेत.
महाविकास आघाडीचे उमेदवार लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.अशावेळी कोणाच्या पारडयात काॅग्रेसची उमेदवारी पडते याचीच चर्चा आता सुरू आहे.

शिवसेनेची माघार …………!
बल्लारपूरात शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गि-हे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी सुरू केली होती.मागील वर्षभरापासून ते मूलमध्ये ठाण मांडून बसले होते.बल्लारपूर मतदारसंघातील विविध समस्यांना घेत त्यांनी आंदोलन करित लक्ष वेधले होते.पण आता बल्लारपूर मतदारसंघातून शिवसेनेने माघार घेतल्याची चर्चा जोरात सुरू आहे.दरम्यान उदया बल्लारपूरातील संत तुकाराम महाराज सभागृहात शिवसेनेने बैठक बोलविली आहे.याठिकाणी आपली भूमीका ते मांडणार आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!