
चंद्रपूर
राजुरा विधानसभा मतदारसंघात आता लढाई अंतीम टप्प्यात आली आहे.प्रत्येकक्षणी राजकीय समीकरण बदलत आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघात गोंडपिपरी तालुक्याची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.अशात शिवसेनेतून घडामोड झाली आहे.उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संदीप करपे यांनी वेगळी भूमीका घेतली आहे.ते शेतकरी संघटनेचे उमेदवार वामनराव चटप यांच्या प्रचारात कामाला लागले आहे.उबाठात फुट पडली असतांना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार मात्र महाविकास आघाडीसोबत आहेत.सध्या याचीच चर्चा सुरू आहे
सुरज माडूरवार हे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत.युवा नेतृत्व म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.पण आता संदीप करपे यांनी वेगळी भूमीका घेतली असली तरी सुरज माडूरवार हे आपल्या समर्थकांसह आमदार सुभाष धोटे यांच्यासोबत आहेत.गावागावात कार्नर सभा घेउन ते लक्ष वेधत आहेत.


