
राजकारणात वारसदारांची प्रथा काही नवी नाही.सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय.चंद्रपूरातील राजुरा विधानसभा मतदारसंघात यंदा सध्या युवा नेतृत्वाची चर्चा सुरू आहे.
मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांचे चिरंजीव अभिजीत धोटे, अनं वामनराव चटप यांचे पूणते दिपक चटप हे सध्या कमालीचे अॅक्टीव्ह आहेत.दोघेही ज्या पध्दतीने प्रचारयंत्रणा राबतीत आहेत त्याची चर्चा मतदासंघात सुरू आहेे.
राजुरा विधानसभा मतदारसंघ तसा तर काॅग्रेसचा बालेकिल्ला होता.पण शेतकरी नेते वामनराव चटप यांनी या गडाला सुरूंग लावला.त्यांनी या मतदारसंघातून तिनदा नेतृत्व केले.आता पुन्हा ते आता निवडणुकीच्या मैदानात आहेत.काॅग्रेसचे आमदार सुभाष धोटे या मतदार संघाचे दुस-यांदा नेतृत्व करित आहेत.ते देखिल पून्हा रिंगणात आहेत.
राजुरा विधानसभा मतदारसंघाची 2019 ची विधानसभा निवडणूक हि अतिशय रंजकदार ठरली होती.या निवडणूकीत सुभाष धोटे यांचा जवळपास अडीच हजार मतांनी विजय झाला होता.
आता पुन्हा दोघेही एकमेंकाच्या विरोधात उभे आहेत.भाजपने यावेळी जिल्हा पदिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांना उमेदवारी दिली आहे.अनेक उमेदवार राजुरा मतदारसंघातून उभे आहेत.
हैं तयार हम…………!
राजुरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यंदाही अतीतटीची होण्याची शक्यता आहे.अनेक उमेदवार रिंगणात असल्याने रंगतदार ठरू शकते.अशात वामनराव चटप यांचे पूतणे दिपक चटप अंन आमदार सुभाष धोटे यांचे चिंरजीव अभिजीत धोटे यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे दिपक चटप हे वामनराव चटप यांनी केलेल्या कामाचे पाढे वाचून दाखवित आहेत.दुसरीकडे धोटेंचे चिरंजीव अभीजीत धोटे ही पूर्ण ताकदीने कामाला लागलेे आहेत.या दोघांचीही चर्चा आता मतदारसंघात होत आहे


