Sunday, June 28, 2026
spot_img

पुन्हा नव्या दमाने लढू……… ! युवा नेते अजय कंकडालवार यांनी दिला कार्यकर्त्यांना उत्साहाचा डोज

 

गडचिरोली

राज्यात बहुचर्चीत असलेल्या गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघात यावेळी पून्हा एकदा धर्मरावबाबा आत्राम यांनीच बाजी मारली.महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.दरम्यान काॅग्रेसचे युवा नेते अजय कंकडालीवार यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा नव्या दमाने काम करू.सामुहिक प्रत्यनाने नवा लढा देउ असे सांगत कार्यकर्त्यामध्ये नवी उमेद निर्माण केली आहे.त्यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याना उत्साहाचा डोज दिला आहे.त्यामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते आता पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली यावेळी इतिहास रचला.डाॅ.नामदेव किरसान यांच्या रूपाने परिवर्तन झाले.अहेरी विधानसभा मतदारसंघात त्यांना मतांची मोठी आघाडी मिळाली.युवा नेते अजय कंकडालावार यांच्या परिश्रमपुर्वक कामगिरीचे ते फळ होते.विधानसभा निवडणुकीत मात्र यावेळी अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेस अजीत पवार गटाच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी बाजी मारली.

दरम्यान या निवडणुकीत काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी प्रचंड मेहनत घेतली.पण आता धनशक्तीपूढे जनशक्तीचा पराभव झाल्याचा आरोप या मतदारसंघात होत आहे.दरम्यान आपल्या पक्षाचा पराभव झाला तरी तो जोश मात्र आपण कायम ठेवायला हवा.निवडणुकीत हार,जित होत असते.पण यामुळे हताश न होता पुन्हा नव्या दमाने आपणास लढा दयावा लागणार आहे.विजय आपलाच होईल हा समारात्मक दृष्टीकोन समोर ठेउन पुढची यशश्वी वाटचाल आपणास करायची आहे.असे सांगत युवा नेते अजय कंकडालवार यांनी कार्यकर्त्यात कमालीची उर्जा निर्माण केली आहे.

येणा-या दिवसात जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका होतील यात आपण आपली ताकत दाखवू,निश्चीतपणे विजय हा आपलाच अशणार आहे.यामुळे पराभवाने व्यथीत न होता आता नवी दिशा ठरवावी लागणार असल्याचेही कंकडालवार म्हणाले.आपल्या विविध सामाजिक कार्याने अजय कंकडालावर हे नेहमी चर्चेत असतात.त्यांनी अनेकदा अनेक अडत्यांना मदतीचा हात दिला आहे.अशा वेळी आता पुन्हा नवा जोश घेत ते मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!