Sunday, June 28, 2026
spot_img

भोंगळेंची एन्ट्री झाली अनं सुधीर मुनगंटीवारांनी केला शाब्दिक कौतूकाचा वर्षाव ….. !

 

चंद्रपूर

राज्यात महायुतीला मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे कार्यकर्ते जल्लोष करित आहेत.चंद्रपूर जिल्हयात कधी नव्हे ते भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत.यामुळे भाजप गोटात कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी 25 हजाराहून अधिक मते घेत विजय मिळविला.तिकडे त्यांचे शिष्य देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात विजयाची मशाल रोवली.आज पोंभुर्णा येथे आदिवासी समाजबांधवाच्या वतीने मुनगंटीवार यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण सुरू असतांना आमदार देवराव भोंगळे कार्यक्रमस्थळी पोहचले.यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी भोंगळे आल्याआल्याच तोंडभरून कौतूक करायला सुरवात केली.भोंगळे यांचे पोंभुर्ण्याशी नाते राहिले आहे.ते याच तालुक्यातून जिल्हा परिषदेत गेले होते.

राज्यात यावेळी महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा दावा त्यांच्यावतीने करण्यात येत होता.सुरवातीच्या विविध सर्वे मध्येही हेच चित्र त्यांनी दाखविले होते.पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल हाती आले तेव्हा सारचं चित्र उलटलंय.महायुतीला ऐतिहासिक बहूमत मिळालय.महाविकास आघाडीवर नामुष्कीची वेळ आली.विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही अशी पाळी आली.भाजपने यावेळी बंपर कामगिरी केली.त्यांचे तब्बल 132 आमदार निवडून आले.देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले.सुधीर मुनगंटीवार भाजपचे जेष्ठ नेते आहेत.ते यावेळी तब्बल सातव्यांदा निवडून आले.ते आता मंत्री होतील यात काही शंका नाही.

आज पोंभूर्णा येथे आदिवासी समाजबांधवाच्या वतीने सुधीर मुनगंटीवार यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मुनंगटीवार मार्गदर्शन करित होते.मंचावर भाजपचे व आदिवासी बांधवांचे नेते मंडळी उपस्थित होते.दरम्यान राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार देवराव भोंगळे हे पोहचले.भोंगळे यांचे आगमन होताच सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर शाब्दिक कौतूकाचा वर्षाव केला.

देवराव भोंगळे हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत.त्यांनी महाविद्यालयीन जिवनापासून सक्रियपणे राजकारण करतांना समाजकारणाची जोड दिली.ग्रामपंचायत सदस्य,सरपंच ते आता आमदार हा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघाचे ते आता आमदार झाले आहेत.राजुरा मतदारसंघात आजपर्यत झाले नाहीत असे कामे भोंगळे करून दाखवतील असे मुनगंटीवार आपल्या भाषणात म्हणाले.सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान भोंगळेंचेी एन्ट्री खासस ठरली.त्यांच्यावर झालेल्या कौतूकाच्या वर्षावाने ते देखिल भारावून गेले.हा प्रसंग बघता उपस्थित कार्यकर्त्यांनीही आंनद व्यक्त केला.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!