
चंद्रपूर:-
“चुका ध्यान”, “गई जान” असे विविध नारे देऊन शासन,प्रशासन वाहतूकीच्या नियंमाबाबत जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने करित असतो.पण बेधडक,वेगाने चालविणारी मानसिकता अजुन जोरातच करामत करित आहे.यामुळेच सातत्याने अपघातात मोठी वाढ होत आहे.आज चंद्रपूर वणी लोकसभा मतदासंघाच्या खासदार प्रतीभा धानोरकर यांचे स्विय सहायक यांच्या मालकीच्या असलेल्या वाहनाने वाहनचालकाच्या चुकीमुळे पादचारी बापलेकींना धडक दिली.यात तरूण मुलगी गंभीर जखमी झाली तर वडिलांनाही इजा झाली.तरूणीला चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.गोंडपिपरी पोलीसांनी आता या प्रकरणाच्या चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.
हल्ली वाढत्या अनं वेगाने होत असलेल्या वाहतूकीने सारेच त्रस्त आहेत.अपघातांत मृतकांच्या संख्येतही वाढ होत आहे.हा चिंतनीय विषय आहे.गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगाव येथील जेटू मरकाम यांच्या पत्नी गोंडपिपरी येथील संदीप हाॅटेल मध्ये काम करतात.त्यांचे पती व मुलगी शालीनी हे देखिल त्यांच्यासोबतच गोंडपिपरीत वास्तव्यास आहेत.
आज दि. ११ डिसेंबर रोजी जेटू मरकाम व त्यांची मुलगी शालीनी मरकाम हे काही कामानितीत्य गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालयाकडे जात होते.वळणावरून दुसरीकडे जात असतांना चंद्रपूरवरून येणा-या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.यात बापलेक जखमी झाले.त्यांना तात्काळ लगतच्या गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.शालीनीची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूरात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर वाहन हे चंद्रपूरच्या खासदार प्रतीभा धानोरकर यांचे स्विय सहायक प्रफुल पुलगमकर यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.वाहनचालक उज्वल सोनटक्के व पुलगमकर यांचे आईवडिल हे या वाहनात होते.ते एका कार्यक्रमासाठी आष्टी येथे जात होते. यावेळी वाहनात प्रफुल पुलगमकर हे उपस्थित नव्हते. पण वाहनचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान आता याप्रकरणी पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे.अशी माहिती गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी दिली आहे.


