
गडचिरोली:-
खनीज संपत्तीने संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्हयाला ‘‘स्टील हब’’ बनविण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांचा एक एक टप्पा पूर्ण होत आहे.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेण्याची आपली इच्छा बोलून दाखविली.दरम्यान आज नववर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोनसरी लॅन्डींग करणार आहेत.कोनसरी येथे पोलाद निर्मीती प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून त्याचे उदघाटन ते करणार आहेत.यासाठी लाॅयड मेटल्स कंपनीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

नक्षलग्रस्त,आदिवासीबहूल व मागास अशी गडचिरोलीची ओळख आहे.पण आता जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण होउ लागली आहे.अनं याला कारणीभूत ठरला तो सुरजागड येथील लोहप्रकल्प.या प्रकल्पाने येथे मोठया उदयोगाची पायाभरणी केलीय.अशात आता याचाच एक भाग म्हणून कोनसरी येथे दस्तूरखूद देवेंद्र फडणवीस यांनी भूमीपूजन केले होते.आता येथील एका कामाचा टप्पा पूर्ण झाला आहे.अनं याचेच उदघाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवसाचा मुहूर्त साधत आपले गडचिरोलीकडे विशेष लक्ष आहे असे संकेत दिले आहेत.
कोनसरी येथे पाच टप्प्यात 20 हजार कोटी रूपयाची गुंतवणूक करून मोठा उदयोग उभारण्यात येणार आहे.एका टप्प्याचे काम पूर्ण झाले असून अनेकांना रोजगाराची संधी मिळाली आहे.तर अनेक जण वेटिंगवर आहेत.गडचिरोली जिल्हा हा उदयोगविरहीत होता.पण आता हा जिल्हा देशाच्या नकाशावर ‘‘स्टील हब’’ म्हणून समोर येउ लागला आहे.

स्थानिकांनाही हवा रोजगार
गडचिरोलीत सुरू असलेल्या लोहप्रकल्पात बाहेर राज्यातील लोकांना मोठा रोजगार असल्याची तक्रार स्थानिकांची आहे.गडचिरोलीचे भूमीपुत्र असतांना अनेकांना अदयापही रोजगारापासून वचिंत राहावे लागत आहे.त्यामुळे या मुदयाला घेत तरूणाईत संताप आहे.मोक्याची पद बाहेर राज्यातील लोकांना अनं कामगाराची पद स्थानिकांना असा प्रकार सुरू असल्याने उच्चशिक्षीत व लायकी असलेले तरूणही संतापलेले आहेत.अशावेळी त्यांचाही विचार व्हायला हवा अशी मागणी ते करित आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणारे प्रकल्प:
लॉयड्स डीआरआय प्लांट
लॉयड्स राज विद्या निकेतन (सीबीएसई शाळा)
लॉयड्स काली अम्माल मेमोरिअल हॉस्पिटल
लॉयड्स वन्या क्लोदिंग कंपनी
फॅमिली क्वार्टर्स आणि पोलीस ऑफिसर्स फॅमिली क्वार्टर्स
जिमखाना आणि बालोद्यान
तसेच यावेळी स्लरी पाईपलाईन, पेलेट प्लांट आणि आयरन ओर ग्राइंडिंग युनिटच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही होणार आहे.
.


