Sunday, October 11, 2026

ये ‘‘रास्ता’’ क्या कहलाता हे….!

 

गडचिरोली

राष्ट्रीय महामार्गावर चिखलात फसलेली बस अनं त्याच्या मागोमाग मार्गावरून जिवाची बाजी लावीत रस्ता गाठणारे,कंबर खोसून पायवाट शोधणा-या हतबल प्रवाश्यांच्या मार्गक्रमणाचा एक बोलका तेवढयाच वेदनादायी फोटोने सध्या गडचिरोलीच्या प्रशासनाची व सत्ताधा-यांची पुरती पोल खोलली आहे.आता ख-या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाची सुरवात गडचिरोली पासून होणार अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल होत.पण आता ‘‘हिच का ती सुरूवात’’ असा संतापजनक सवाल या मार्गाने जाणारे प्रवाशी करित आहेत.

गडचिरोली जिल्हयाला छत्तीसगड,तेलंगणा राज्याची सिमा आहे.आलापल्ली ते सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय रहदारीचा आहे.पण गेल्या सहा वर्षापासून या विविध अळथळयांनी या मार्गाचे बांधकाम रखडलेेले आहे.देवेद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा गडचिरेाली जिल्हयाचे पालकमंत्री झाले तेव्हा त्यांनी या मार्गाचे बांधकाम तातडीने पुर्णत्वास करावे असे निर्देश दिले होते.पण सहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही या मार्गाचे काम पुर्ण होऊ शकले नाही.आता तर हा राष्ट्रीय महामार्ग शेतातील पाणंद रस्त्याप्रमाणे झाला आहे.संपूर्ण मार्ग चिखलमय असल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे.

गडचिरोली जिल्हयात मोठया समस्या आहेत.येथील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.सुरजागडने रोजगाराची दालन खुली केल्याचा दावा सत्ताधारी करित असले तरी स्थानिकांना अदयापही पाहिजे त्या प्रमाणावर रोजगार मिळाला नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.रानटी हत्तींच्या कळपांनी सामान्यांत भितीचे वातावरण आहे.शेतकरी कृषीविजेअभावी हतबल ठरीत आहेत.गडचिरोलीतील मुख्य महामार्गाच्या समस्या तर वेगळयाच आहेत.पावसाळयात दिवसोंदिवस अनेक मार्ग ठप्प होतात.मागील काळात गर्भवती महिलेला जेसीबीच्या बकेटमधून समोर न्यावे लागले होते.

‘‘स्टिल सिटी’’ चे उधिष्ट ठेवीत गडचिरोची ची वारी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच गडचिरोलीचे पालकमंत्रीपद ठेवले.दस्तुरखुद राज्याचे प्रमुख आपल्या जिल्हयाचे पालक झाल्याने विकासाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले.पण ते आता गडचिरोलीकडे येतच नाही.अशी खंत अनेकांची आहे.काॅग्रेसने हा मुददा वारंवार उपस्थित केला आहे.महाराष्ट्राची सुरवात आता गडचिरोलीपासून होईल अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होत.पण तो दिवस येणार तरी कधी हा ही प्रश्न आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!