Sunday, June 28, 2026
spot_img

“हारी बाजी को जितना हमे आता हे…!” उल्हास करपे यांच्या संचालकपदाचा मार्ग मोकळा

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या संचालकपदाची निवडणूकीत आता कमालीची राजकीय घडामोड घडली आहे.लगतच्या वर्षाच्या मुददयावरून बाद झालेल्या उमेदवारांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.सुदर्शन निमकर,विजय बावणे,विजय देवतळे हे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.तर गोंडपिपरी तालुक्यातून ‘‘अ’’ गटातील उमेदवार उल्हास करपे यांना संचालकपदाची लाॅटरी लागली आहे.त्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उमेदवारी रद्द झाल्यानंतर अतिशय नैराश्यात गेलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून ते “हारी बाजी को जितना हमे आता हे” असे म्हणू लागले आहेत. येत्या दहा जुलै रोजी निवडणुक होत असून उल्हास करपे यांच्या विरोधातील उमेदवार अमर बोडलावार यांना चुकीचा दाखला जोडण्याप्रकरणी न्यायालयातून दिलासा मिळू शकला नाही.आता याची सहकार वर्तुळाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेंच्या संचालकपदाकरिता निवडणूक कार्यक्रम लागल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या.गोंडपिपरी तालुक्यातून अ गटातून उल्हास करपे व अमर बोडलवार हे आमनेसामने होते.पण पुरूषोत्तम रेचनकर यांनी त्यांच्याविरूध्द कोर्टात धाव घेतली होती.लगतचे वर्ष 2023-24 असतांना या उमेदवारांनी 2024-25 या वर्षाचे आॅडीट जोडल्याने त्यांची उमेदवारी रदद करावी अशी मागणी करित रेचनकर यांनी कोर्टात दावा पेश केला.दरम्यान यावर नागपूर च्या न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करित करपे व बोडलावार यांची उमेदवारी रदद केली.दरम्यान लगतचे वर्ष या मुददयासोबत अमर बोडलावार यांनी पैनगंगा खोरे वाहतूक संस्था चंद्रपूर मर्या.कोरपणा चं संचालक असल्याचे पत्र जोडले होते.पण विरोधकांनी हे पत्र बनावट असून बोडलावार हे संस्थेचे संचालक नसल्याचे म्हटले होते.दरम्यान तपासणीत हे सिध्द झाल्याने बोडलावारांची उमेदवारी अपात्र ठरविण्यात आली.

2024-25 हे लगतचे वर्ष गृहीत धरावे व आपली उमेदवारी कायम ठेवावी यासाठी संचालकपदाच्या उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.आज कोर्टाने निकाल देत 2024 -2025 हे वर्ष गृहीत धरण्याचा निर्णय दिला.यामुळे उमेदवारी रदद झालेल्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला.उल्हास करपे हे आता अविरोध रित्या संचालक म्हणून निवडून येणार आहेत.याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.बोडलावारांना लगतच्या वर्ष या मुदयावर दिलासा मिळाला असला तरी संचालकाच्या बनावट दाखला हा विषय त्यांच्या अंगलटी पडला आहे.

उल्हास करपे हे चंद्रपूर जिल्हयातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते आहेत.ते गेल्या पंचेवीस वर्षापासून सातत्याने बॅकेवर संचालक म्हणून निवडून येत आहेत.यावेळेस त्यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी मोठीच फिल्डींग लावली होती.पण “हारी बाजी को जितना हमे आता हे” असे सांगत अचुक टायमींग साधत त्यांनी बाजी मारली.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!