
राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या मुददयावरून वातावरण चांगलच तापलय.भाजपाचे खासदार निशीकांत दुबे यांनी मराठी माणसाला डिवचणारे भाष्य केले होते.सोबत ‘पटक पटक के मारेंगे’अशी टिप्पणी केली होती.दुबे यांच्या या विधानानंतर राज्यातून मोठा संताप बाहेर आला.आता याच मुद्द्याला घेत खासदार वर्षा गायकवाड,खासदार प्रतीभा धानोरकर यांनी संसदभवनाच्या आवारात दुबेंची चांगलीच गोची केली.त्यांना खडे बोल सुनावले.या प्रकारामुळे गोंधळलेल्या दुंबेना त्या परिसरातून चक्क पळून जाण्याची वेळ आली.जय महाराष्ट्र चा नारा देत दुबे यांना शाब्दिक दणका देणाऱ्या खासदार रणरागिणींच्या या रूपाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबईत केवळ टक्के मराठी लोक राहतात.आमच्या पैशावर येथील मराठी माणूस आपल जिवन जगत आहे.असे सांगत भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी ‘पटक पटक के मारेंगे’ अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती.मराठी माणसाला हा डिवचणारा प्रकार होता.त्यांच्या या विधानानंतर राज्यातील भाजप नेते तोंडघशी पडले होते.
दरम्यान काल संसदेच कामकाज काही मुददयावरून स्थगित झाल होतं.मराठी माणसाचा अपमान करणा-या भाजप खासदार निशीकांत दुबे हे कुठे आहेत याचा शोध मराठी खासदार वर्षा गायकवाड,खासदार प्रतीभा धानोरकरांनी घेतला.अनं ते संसदेच्या लाॅबीत त्यांना दिसले.मगं काय.त्या तिथे पोहचल्या.खासदार गायकवाडांनी दुबेला असे खडे बोल सुनावले कि त्यांना तिथून तातडीने काढता पाय घ्यावा लागला.यावेळी खासदार प्रतीभा धानोरकरांनी देखिल आक्रमक रूप दाखवित दुबे यांना कुणाला अनं कशाला मारणार असा सवाल विचारला.यानंतर याठिकाणी अनेक मराठी खासदार एकवटले.दरम्यान महिला खासदारांचे आक्रमक रूप बघून आप तो मेरी बहन हे असे सांगत निशीकांत दुबेंना परिसरातून चक्क पळ काढावा लागला.
काल संसदेच्या परिसरात घडलेल्या या प्रकाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे.हिंदीसक्तीच्या मुददयावरून महाराष्ट्र सरकार बॅकफुटवर आहे.अशातच निशीकांत दुबेच्या त्या वक्तव्याने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे.
मराठी मुद्द्यावर संसदेत भाजप खासदाराला शाब्दिक दणका देणाऱ्या खासदार वर्षस गायकवाड,खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आक्रमक भूमिकेची आता चांगलीच चर्चा होत आहे



