
चंद्रपूर
जमा केलेला पै पै आपल्या शेतीत गुंतविणा-या बळीराजाला हाडोखाने त्रस्त करून सोडले.अशा अडचणीच्या काळात धानाच्या बोनसची रक्कम जमा होणार या बातमीन त्यांच्यात आनंदाची नवी उमेद निर्माण झाली.शासनानही त्यांच्या वेदंनावर फुंकर घालण्यासाठी बोनसची रक्कम जमा केली.पण सदर रक्कम जमा करणा-या यंत्रणेनी येथेही त्यांना वेदनाच दिल्यात.सारे नियमानुसार असतांना केवळ जास्त शेतकरी होत आहेत असा दाखला देत त्यांनी आपले हात आखळते घेतलेत.एकाच गावातील काही शेतक-यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होत असतांना शेजारीलच अनेक शेतकरी बांधव मात्र अडचणीच्या काळात नैराश्यात गेले आहेत.गोंडपिपरी तालुक्यात गेल्या आठ दिवसात दोन युवा बळीराजाने आपले जिवन संपविले.अशात तब्बल चार हजार शेतक-यांना मदतीपासून वंचित ठेवणारे हे कोण आहेत.त्यांना नेमक काय साध्य करायचय हा एकच एक प्रश्न आता बळीराजा विचारू लागला आहे.शासन हक्काचे पैसे देत असतांना “यांच्या बापाचं काय जातय” असे संतप्त बोल आता गावागावात उमटू लागले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाने धानउत्पादक शेतक-यांना बोनस जाहीर केला.गोंडपिपरी तालुक्यातील 2700 शेतक-यांच्या खात्यात प्रती हेक्टरी 20 हजार रूपये जमा झाले.पण तब्बल चार हजाराहून अधिक शेतकरी धानाच्या बोनसपासून वंचित आहेत.शासनाने बोनसची रक्कम दिली असतांनाही संबधीत यंत्रणेच्या नियमबाहय प्रकाराने हे सारे बोगस काम सुरू आहेत.हा प्रकार गंभीर असून तातडीने या शेतकरी बांधवाना धानाच्या बोनसची रक्कम देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री तथा युवा नेते भानेश येग्गेवार यांनी केली आहे.
गोंडपिपरी तालुका हा उदयोगविरहीत आहे.शेती हेच येथील नागरिकांच्या जिवनामानाचे एकमेव साधन आहे.अशात या तालुक्यात मोठया प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते.संवेदनशिल महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांचे हित लक्षात घेता धानउत्पादकांना प्रती हेक्टरी विस हजार रूपयाचा बोनस जाहीर केला.यानुसार संबधीत शेतक-यांना दयावयाची बोनसची रक्कम संबधीत यंत्रणेकडे जमा झाली आहे.कोरपणा येथील खरेदी विक्री सह.संस्था व कंरजी येथील आदिवासी सेवा सह.संस्थांच्या माध्यमातून नोंदणी केली गेली.यात करंजी येथील नोंदणी करणा-या संपूर्ण शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली मात्र कोरपणा संस्थेत नोंदणी करणा-या 6388 शेतकऱ्यांपैकी केवळ 2700 शेतक-यांनाच बोनसचा लाभ मिळाला.
उर्वरित चार हजाराहून अधिक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत.त्यांना वंचित ठेवण्याचे नेमके कारण कुणीही सांगायला तयार नाही.एकाच गावातील काही शेतक-यांना लाभ मिळत असतांना दुसरे मात्र अदयापही प्रतीक्षेतच आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी बांधवांत कमालीचा संताप पसरला आहे.एकीकडे शासन शेतकरी बांधवांच्या हितासाठी मदत करित असतांना वितरण करणा-या यंत्रणा असे बोगस प्रकार करित आहेत.हा प्रकार निंदनीय आहे.त्यामुळे तातडीने उर्वरित शेतकरी बांधवांना धानाच्या बोनसची रक्कम देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका महामंत्री तथा युवा नेते भानेश येग्गेवार यांनी केली आहे.
“शासनाने शेतकरी बांधवासाठी धानाच्या बोनसची रक्कम जाहीर केली.मदतीची रक्क्म संबंधित यंत्रणेकडे पाठविली.पण हि यंत्रणा आता मदत देण्यास “ना” म्हणत आहे.याबाबत बोलायला ते तयार नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या यंत्रणेने तातडीने शेतकरी बांधवांचे हक्काचे पैसे द्यावेत अन्यथा त्यांची खैर नाही.”
भानेश येग्गेवार
तालुका महामंत्री
भाजयुमो


