
चंद्रपूर :
नगरपरिषदेच्या निवडणुकांच बिगुल वाजलय.प्रत्येक पक्ष,नेते कार्यकर्ते कामाला लागलेत.आपलाच विजय होणार असं ते ठासून सांगताहेत.त्याचे समीकरणही ते बांधताहेत.चंद्रपूरातील राजू-यात तब्बल चोवीस वर्षानंतर झालेल्या एका समीकरणाची मोठीच चर्चा होतेय.शेतकरी संघटना अनं काॅग्रेसने आठवले रिपाईला घेत युती केलीय.राजुरा मतदारसंघात तब्बल 43 वर्ष राजकीय कारकिर्द असणारे धुरंधर नेते वामनराव चटप यांनी “हम लढेंगे” चा नारा दिलाय.अनं त्यांना हात देत दोनदा आमदारकी भुषविणा-या सुभाष धोटेंनी “जितेंगे” चा सिग्नल देत “माहोल” केलाय.राजुरा नगरात कुशल नेतृत्वाची झलक दाखविणा-या अरूण धोटेंना या आघाडीने आपला उमेदवार घोषित केलाय.
राजुरा विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.काॅग्रेसचे अनेक नेेते याच मतदारसंघातून आमदार झालेत.पण दरम्यानच्या काळात बळीराजाचा आवाज बुलंद करित वामनराव चटपांनी त्यांच्या या किल्याला सुरूंग लावला.ते तब्बल तिनदा या मतदारसंघाचे आमदार होते.
2024 च्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वांचीच भाकीत सपशेल फेल ठरली.घुग्गुसचे “निवासी”पूत्र तथा तोहोगावचे “जावई”,सुधीर मुनगंटीवारांचे जिवलग देवराव भोंगळेनी बाजी मारली.भ्रमात असलेल्या सुभाष धोटेंचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला.वामनराव चटप यांचेही स्वप्न भंगले.
भोंगळेंचा विजय अनं राजु-यातील अनेक मातब्बरांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला.दरम्यान काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोटचोरीचा मुददा समोर आणला.त्यांनी यासंदर्भात घेतलेल्या दुस-या पत्रपरिषदेत राजु-यांचा उल्लेख केला.अनं येथूनच सारे संदर्भ बदलले.या मतदारसंघात मोठया प्रमाणात बनावट मतदारांचा समावेश करण्यात आल्याबाबत काॅग्रेसचे सुभाष धोटे व शेतकरी संघटनेेचे वामनराव चटप यांचे एकमत झाले.अशा पध्दतीने जर वोटचोरी होत राहिली तर लोकशाहीसाठी हि मारक स्थिती निर्माण होईल अनं हे काही बरोबर नाही हा मुद्दा घेत तीव्र संताप व्यक्त करन्यात आला.
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.अशात वोटचोरी करणा-यांना दणका देण्यासाठी,धनशक्तीचा मोठा वाफर करणा-यांना फटकारण्यासाठी काॅग्रेस,शेतकरी संघटनेेेने व भाजपाची सााथीदार आठवले रिपाई गटाने राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकत्र येण्याच्या निर्धार केलाय.नुकत्याच पार पडलेल्या एका महत्पपूर्ण बैठकीत अतिशय जोशपूर्ण वातावरणात जेष्ठ नेते वामनराव चटप यांनी “हम लढेंगे” चा नारा दिलाय.त्याला जोरदार सकारात्मक प्रतित्तर देत सुभाष धोटे यांनी “जितेंगे” म्हणत राजु-यात कमालीचा जोश भरलाय.या आघाडीकडून आता राजुरा येथील अरूण धोटे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशणाार आहेत.अरूण धोटे हे राजु-यातील “राॅकस्टार” आहेत.गेली अनेक वर्ष नगराचे नेतृत्व करणारे अरूण धोटे अजुनही अनेकांच्या मनात आहेत.
भोंगळे म्हणाले हे घाबरले
राजुरा विधानसभा मतदारसंघात देवराव भोंगळे हे जरी आमदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांच्यापुढे बरीच आव्हान आहेत.माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय धोटे यांचीदेखिल राजुरा नगरातील राजकारणात महत्वाची भुमिका अशणार आहे.काॅग्रेस,शेतकरी संघटना व आरपीआई च्या युतीवर आमदार भोंगळे यांना वार्ताहराने प्रश्न विचारला.याला उत्तर देतांना त्यांना हि सर्व मंडळी कमालीची घाबरली असल्याचे सांगितले.आहे.राजु-यात अतिशय उत्तम उमेदवार आम्ही देणार आहोत.अनं आमचाच विजय होईल असेही भोंगळे म्हणाले.दरम्यान चटपांनी त्यांना प्रतित्तर देत त्यांनी अनेकांशी युती केली आहे.मग ते घाबरले असे म्हणावे का असे सांगत त्यांना चांगलाच टोमणा मारला आहे.


