Saturday, October 10, 2026

सेवा”व्रती अमरभाऊ….!

 

दुस-यांसाठी मदत करण्यांची भावना अलीकडे दुर्मीळ झालीय.सारेच आपल्या विश्वात रमू लागलेत.अशातही अशी काही माणस आहेत.जे समाजातील इतरांचा विचारच करित नाही.तर त्यांना मदतीचा हात देतात.त्यांच्या अडीअडचणींना समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.माणूसकी जोपासत संवेदनांना प्रतिसाद देतात.अडत्यांचा आधार बनतात.चंद्रपूर जिल्हा भाजपचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य,महाराष्ट्र,तेलंगणातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री.संत कोंडय्या महाराज देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष,आमचे गुरूवर्य जेष्ठ बंधू आदरणीय अमरभाऊ बोडलावार हे यापैकीच एक..

जनसामान्याची सेवा हे ब्रिद घेत भाऊंचा सुरू झालेला सामाजिक,राजकीय प्रवास सातत्याने अविरतपणे सुरू आहे.चंद्रपूरातील भंगाराम तळोधी या गावातून नेतृत्वाची झळाळी आज संपूर्ण जिल्हयात आज वेगळी छाप सोडत आहे.
जास्त न बोलता कामाला पुर्णत्वास न्यायच हा त्यांचा स्वभावगूण आहे.समाजातील अनेक वंचित घटकांना शासकीय योजनांसाठी होत असलेला नाहक त्रास,लहान कागंदासाठी होत असलेली कुचंबणा अनं त्यातून गरीब,विधवा,वयोवृध्द नागरिकांना होत असलेल्या वेदना त्यांनी टिपल्या.अनं त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कार्यालय उघडल.गोंडपिपरीतील आझाद हिंद चौकात दररोज शेकडो लोकांची गर्दी या कार्यालयात असते.तिथून मोफत त्यांची कामे केली जातात.कागदपत्र काढली जातात.केवळ कागदपत्रच काढली जात नाही तर काम रखडल असेल तर त्याचा फाॅलोअप स्वत अमरभाऊ घेतात अनं काम पूर्ण करून दाखवितात.

गेली तीस वर्ष राजकारणात विविध पदे भुषविणारे अमरभाऊ आजही सामान्यांत मिसळतात.त्यांच्या व्यथा,वेदना जाणून त्या कशा सोडविता येतील यासाठी प्रयत्न करतात.त्यांचा हाच गुण अनेकांना आपलासा करून जातो.
राजकारण करित असतांना त्यांनी कधीच कुणाचा विरोध केला नाही.पण आपली चातुर्यक्षमता वारंवार सिध्द केली.आपल्या बालेकिल्यातून बाहेर पडीत त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघात विजयाचा पताका रोवला.त्यांची पत्नी वैष्णवीताई यांनाही त्यांनी नेतृत्वाची संधी दिली.बाजार समिती हे सत्तेचे तस मोठ केंद्र. आजपर्यत बाजार समितीत काॅगे्रेसचाच झेंडा होता.पण त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच बाजार समितीवर भाजपने विजयाची सुरवात केली.अनेकांना स्वतं मदत करित संचालक बनविले.आजही हि मंडळी त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करित आहेत.
भाजपचे राज्यातील जेष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाच्या दृष्टीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.राजुरा विधानसभा मतदारसंघात देवरावदादा भोंगळे आमदार झाले.त्यांच्या विजयात गोंडपिपरी तालुक्याचे मोठे योगदान होते.अर्थात यामागे अमरभाउंच्या नियोजनाचे मोठे योगदान आहे.

अमरभाउंनी राजकीय,सामाजिक क्षेत्रासह धार्मीक कार्यातही सातत्याने योगदान दिले आहे.श्री.संत कोडया महाराज देवस्थान संस्थानाची धुरा सांभाळतांना त्यांनी सुधीरभाउंच्या मदतीने विकासाचे नवे पांयडे पाडले.संस्थानच्या विकासात त्यांचे योगदान मोठे राहिले.
आज अमरभाउंचा वाढदिवस आहे.वाढदिवसानिमीत्ताने त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतांना आमच्यासारख्यांना मोठा हर्ष होत आहे.आपल्या वाढदिवसाला महाआरोग्य शिबीर घेत त्यांनी आपल्या दायत्वाचा परिचय दिला आहे.

लेखकः-
स्वप्नील अनमुलवार
उपसभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती,गोंडपिपरी

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!