
चंद्रपूर:-
विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर प्रचंड आत्मविश्वास वाढलेल्या राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोेंगळे यांना नगरपरिषेदच्या निवडणुकीने तिहेरी धक्के दिले आहेत.राजुरा,गडचांदूर येथील निवडणुकीत भाजपचा पराभव तर झालाच पण त्यांचे होमग्राउंड असलेल्या घुग्गुसमध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड बघायला मिळाले.दुसरीकडे राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारीत अरूण धोटे यांनी आपले निर्वीवाद वर्चस्व कायम ठेवले.ते चौथ्यांदा राजुरा नगरपरिषदेची कमान पकडण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.जिल्हयात तब्बल पक्षाचे पाच पाच आमदार असतांना अकरा पैकी केवळ दोनच जागांवर विजय मिळविण्याची पाळी भाजपवर आली आहे.काॅग्रेसने या निवडणुकीत सात नगरपरिषंदावर आपला झेंडा रोवीत जबरदस्त परफार्म दिलाय.

निलेश ताजणेंची बाजी
बहुचर्चीत नगरपरिषद गडचांदूरच्या निवडणुकीत तिस-या आघाडीने बाजी मारली.आघाडीचे नगराध्यक्षादाचे उमेदवार निलेश ताजणे यांनी बाजी मारली.निलेश ताजणे यांना भाजपची उमेदवारी मिळावी अशी अनेकांची मागणी होती.मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.यामुळे ताजणेनी आपली ताकद दाखवून दिली.
वडेट्टीवारांचा डाॅन्स….मुनगंटीवार मात्र नाराज
आज नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.यात काॅग्रेसने मोठे यश संपादित केले.काॅग्रेसचे तब्बल सात नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना आनंद गगनात मावेनासा झाला.त्यांनी भन्नाट डाॅन्स करित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.”पाच पे एक हि भारी हे” असा टोमणा मारीत त्यांनी भाजपच्या पाचही आमदारांचे चिमटे घेतले. दुसरीकडे जिल्हयात भाजपची झालेली पिछेहाट व दस्तूरखुद आपल्या मतदारसंघातील दोन मोठया नगरपरिषदेत उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार कमालीचे व्यथीत झाले.काँग्रेसने वडेट्टीवारांना शक्ती दिली.मात्र आमच्या पक्षाने मला मंत्रीपद दिल नाही.मला नाही तर नाही पण पुर्व विदर्भातील धानपटटयातील चार जिल्हयापैकी एकाला मंत्रीपद दिल नाही. जे कि त्यांना मिळायला हव होत.अस ते म्हणाले.दुस-या पक्षातून आलेल्या प्रवेश देत त्यांनाच शक्ती देण्याच काम सध्या चालल आहे.याचाच फटका आम्हाला या चारही जिल्हयातल्या निकालातून दिसून आला.अशी टिप्पणी करित सुधीर मुनगंटीवार यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली.


