
ते ७४ वर्षाचे पण त्यांच्यातील जोश अगदी युवकांना लाजविणारा. ते हात वर करून “हम होंगे कामयाब” चा नारा देतात.अन अनेकांत आशेची नवी ऊर्जा आपसूकच निर्माण होते. सकाळी उठून रोजच शेकडो किलोमीटर चा प्रवास करायचा. लोकांच्या गाऱ्हाणी आपुलकीने एकूण घेत त्यावर तोडगा कसा काढता येईल याचा सातत्याने पाठपुरावा करायचा. ज्या गावात गेले कि तेथील बहुतांश जणांचे नाव त्यांना बिनपाठच. अनेकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घ्यायच्या. शेतकरी,कामगार,व्यापारी अन युवा या सर्वाना अजूनही आपलेसे वाटणारे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक आंदोलन केलीत.ती यशश्वी करून दाखविलीत. आपल्या वकिली चा वाफर त्यांनी जनसामान्यासाठी केला. तब्बल तीनदा त्यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.मनात आणले असते तर सत्ताधाऱ्यांसोबत हातमिळविनी करून ते मंत्री झाले असते.पण आपल्या भूमिकेशी, तत्वांशी,निष्ठेशी तळजोड केली नाही. शेतकरी, जनसामान्यांसाठी आपल्या आयुष्याची अनेक दशक खर्ची घालणारे उत्कृष्ट संसदपट्टू शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप साहेबांचा आज वाढदिवस आहे.
यानिमित्ताने त्यांना अनेकानेक शुभेच्छा……!
अलीकडे राजकारणात निष्ठा वैगेरे हा प्रकार अतिदुर्मिळ झालाय. सत्ता मिळविण्यासाठी राजकारणी काय काय करतील याचा नेम नाही.पण काही व्यक्तिमत्व मात्र निरंतरपणे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करतात. शेतकरी कुटुंबात जण घेतलेले वामनराव चटप साहेबानी बळीराजाशी नाळ तुटू दिली नाही.राजुरासारख्या काँग्रेस च्या भक्कम बालेकिल्ल्याला पहिल्यांदा सुरुंग लावण्याचे काम त्यांनीच केले.अर्थात त्यांचे मोठे परिश्रम यासाठी कारणीभूत ठरले.तीनदा आमआर ,दोनदा उत्कृष्ठ संसदरत्न अशी त्यांची उल्लेखनीय कामगिरी लक्षवेधी ठरली. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी अनेकदा मोठे आंदोलन केलीत. थेट केंद्रीय मंत्रीमहोदयांच्या घरावर धडक देत त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी एल्गार पुकारला.
वय झाले असले तरी “हम होंगे कामयाब” हा ते देत असलेला नारा तरुणांना लढण्याची नवी ताकद देतो. राजुरा मतदारसंघात अजूनही त्यांची मोठी ताकद आहे हे त्यांनी मागील निवडणुकीत दाखवून दिले. निवडणुकीत पैशाचा ओंठ्या प्रमाणात झालेला वाफरचा दाखला देत त्यांनी याविरोधात भूमिका मांडली.सत्तेच्या मोहपाशात न अडकता आपला बाणा कायम जपणारे, लोकांशी आपले नाते अधिक घट्ट करणारे ,शेतकरी,कामगारांच्या विविध समस्येवर आपला आवाज बुलंद करणारे, वेगळ्या विदर्भाची लढाई लढण्यासाठी आपल्या आयुष्य समर्पित करणारे कुशल नेतृत्वाची खाण असणारे माजी आमदार आदरणीय वामनराव चटप साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, या कामनांसह वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …….!

रामकृष्ण सांगडे
तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, गोंडपिपरी



