
चंद्रपूर
लोकसभा निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नव्हती.तसे मी आधीच जाहीर केले.पण पक्षाने आदेश दिला.अनं मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो.त्या निवडणुकीत माझा पराभव झाला.खर सांगायच झाल्यास या पराभवाने माझा आत्मविश्वास कमी झाला.मनात व्दंद निर्माण झाले.पण या मतदारसंघातील मायबाप जनतेनी माझ्या मनातील व्दंद दूर केले.त्यांनी दाखविलेला हा विश्वास,त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही.या प्रेमाची परतफेड तर होणार नाही.पण तुमच्यासाठी आयुष्यभर मी लढत राहिल असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
विकास हा आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.सामान्यांना न्याय देण्यासोबत समाजातील एकही घटक उपेक्षित राहू नये हा आपला मानस आहे.बल्लारपूर मतदारसंघात आपण मोठा विकास केला.पण आता निवडून आलो म्हणून मी थांबलो असे नाही.पुन्हा अधिक ताकदीने विकासाचा पाया रोवू.पोंभुर्ण्यात 40 हजार कोटी रूपयाचा पोलाद प्रकल्प सुरू होण्यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे.निवडणुकीपुर्वी मी जेव्हा हा शब्द दिला तेव्हा अनेकांना मजाक वाटली.हा प्रकल्प या परिसरातील 60 हजार बेरोजगारांसाठी नवी संजीवनी देणारा ठरेल.मूलमध्ये पाॅलीटेकनीक महाविद्यालयाची उभारणी आपण करणार आहोत.पोंभुर्ण्यातील आदिवासी बांधवांसाठी आपण विशेष उपक्रम राबविणार आहोत.यामाध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे माॅडेल आपले तयार असल्याचे प्रतिपादन भाजपचे जेष्ठ नेते तथा नवनियुक्त आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आज आदिवासी समाजाच्या वतीने पोंभुर्ण्यात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार देवराव भोंगळे,आदिवासी समाजाचे नेते जगन येलके,भाजपचे नेते हरिष ढवस,माजी सभापती विनोद देशमूख यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सुधीर मुनंगटीवार हे पहिल्यांदाच पोंभूर्णा येथे आले होते.यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली.आदिवासी समाजाच्या वतीने त्यांना विशेष स्मृतीचिन्ह देउन त्यांना मान दिला.यावेळी मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींचे विशेष कौतूक केले.मतदारसंघात महिलंानीही आपला मोठा प्रचार केला.त्यांनी स्वयंस्फुर्तीने तयार केलेले नारे अतिशय प्रभावी ठरले.”कटोरे मे जिरा है” “सुधीर भाउ हिरा हे “त्यांनी दिलेले नारे आपणास अतिशय भावले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत 25 हजारांहून आघाडी घेत विजय मिळवून दिल्याबाबत त्यांनी मतदारांचे आभार मानले.प्रत्येक बहिणींच्या वाटयाला सुखीसमाधानाचे जिवन कसे येईल यासाठी पुढील पाच वर्ष विकासाचा माॅडेल उभारू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पुढील काळात 12 हजार 500 जागांची भरती करावयाची आहे.यात आदिवासी बांधवाच्या वाटयाला जास्तीत जास्त जागा कशा खेचून आणता येतील यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गरीबांच्या विकासासाठी तुम्हीही पुढाकार घ्या
आपणाकडे विकासाचा माॅडेल आहे.यासाठी आता प्रशासकिय यंत्रणेची वाट न बघता त्यांच्या विकासाकरिता स्थानिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा.एकही गरीब कुटुंब बेघर राहता कामा नये याची खबरदारी घेत त्यांनी जबाबदारी स्विकारावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


