Saturday, October 10, 2026

अटलबिहारी वाजपेयींनी दिली होती यांच्या घरी भेट, तिसरी पिढीही सक्रियपणे लागली पक्षाच्या कामात…….!

 

चंद्रपूर

राजकारणात अलीकडे नैतिकता वगैरे उरलेली नाही.सत्तेसाठी अनेक पक्ष बदलविणारे काही कमी नाहीत.‘‘जिधर दम,उधर हम’’ अशी काहीशी स्थिती बघायला मिळते.पण अशातही काही विचारधारा जोपासणारी माणसं,कुटुंब आहेत.चंद्रपूर जिल्हयातील बोनगीरवार यापैकीच एक कुटुंब.संघाच्या स्थापनेपासून तर भाजपचे सक्रिय काम करतांना त्यांची तिसरी पिढी तेवढयाच ताकदीने मैदानात उतरून आपल्या कुटुंबियांना वैचारिक वारसा चालवित आहे.दस्तूरखुद अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती.त्यांनी आपुलकीने संवाद साधला.भाषणही दिले.पुढे ते पंतप्रधान झाले.अनं हा ऐतिहासिक प्रसंग ठरला.

राज्यात पहिल्यांदाच भाजपने रेकार्डब्रेक विजय मिळविला.राज्याच्या इतिहासात कधी नव्हे असा इतिहास घडला.भाजपने तब्बल 132 विधानसभेच्या जागा जिंकत विक्रम केला.अर्थात यामागे राज्यातील हजारो प्रामाणीक कार्यकर्त्यांचे परिश्रम,त्यांनी केलेले यशश्वी नियोजन कारणीभूत ठरले.सत्ता बदलली कि नेते,कार्यकर्ते पक्ष बदलवितात.पण गोंडपिपरी येथील बोनगीरवार कुंटुबिय त्यांच्या तिन पिढयापासून भाजपशी एकनिष्ठ आहेत.भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अटलबिहारी यांनी त्यांच्या घरी भेट देत संवाद साधला होता.यावेळी त्यांनी याठिकाणी मार्गदर्शनही केले होते.आता भाजपच्या विजयासाठी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच जिवाचे रान करित राजुरा विधानसभा मतदारसंघात देवराव भोंगळे यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

चंद्रपूर जिल्हयातील नवरगाव हे आरएसएस चे प्रमुख केंद्रस्थान होते.यानंतर गोंडपिपरी तालुक्यात दादा देशकर यांच्या माध्यमातून त्यांच्या चळवळी सुरू झाल्या.त्यावेळी वामनराव बोनगीरवार हे सक्रियपणे काम करायला लागले.आता त्यांची तिसरी पिढीही भाजपचे काम करित आहे.त्यांचे चिरंजीव दिपक बोनगीरवार हे आता सत्तर वर्षाचे आहेत.ते जेेष्ठ नेते आहेत.त्यांनी विविध पदावर काम केल आहे.संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष होते.या वयातही ते पक्षासाठी सातत्याने काम करित आहेत.दिपक बोनगीरवार यांचे चिंरजीव स्वप्नील बोनगीरवार हे भाजपचे शहर महामंत्री म्हणून कार्यरत आहेत.तर त्यांची सून प्रांजली बोनगीरवार या भाजप शहर महिला उपाध्यक्ष म्हणून पक्षासाठी योगदान देत आहेत.नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली.यावेळी अख्ख बोनगिरवार कुटुंब मैदानात उतरल.भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांच्या विजयासाठी त्यांनी जिवाचे रान केले.

राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात दुस-यांदा कमळ फुलविण्यात देवराव भोंगळे यशश्वी ठरले.त्यांच्या विजयात भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांचे मोठेच योेगदान राहिले आहे.अशावेळी बोनगीरवार परिवाराने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली.

1983 या वर्षी अटलबिहारी वाजपेयी आमच्या घरी आले होते.त्यांनी आमच्या आजोबांशी आपुलकीने बराच वेळ संवाद साधला.आता आमची तिसरी पिढीही भारतीय जनता पक्षाच्या कामात सक्रियपणे आहे.
                                      स्वप्नील बोनगीरवार,शहर महामंत्री भाजप गोंडपिपरी

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!