
चंदपूर:-
राज्यात महायुतीच सरकार आल.भाजपन बंपर विजय मिळविला.यामुळे भाजपच्या गोटात उत्साहाची लहर असतांना आता मात्र भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत चंदपूर जिल्हयातील नागरिकांत नाराजीचा सुर आहे.अनं त्याला कारणीभूत ठरलेय ते भाजपचे जेष्ट नेते,तब्बल सातदा आमदार असणारे,अनेक पदांचा कारभार हाती घेउन त्याला न्याय देणारे सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रीमंडळात समावेश नसणे.त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने आता कार्यकर्त्यांनीच पुढाकार घेत चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी आम्हाला सुधीरभाउच हवे अशा मागणीचा सुर सुरू केला आहे.सार्वजनिक ठिकाणासह समाजमाध्यमात सध्या एकच विषय ”ट्रेंड” होतोय तो म्हणजे सुधीरभाउंना मंत्रीपद दया.दरम्यान आमदार देवराव भोंगळे अनं भाजपच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना मंत्रीमंडळात सामावून घेण्यासाठी साकडे घातलेत.
सुधीर मुनगंटीवार हे गेली चाळीस वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत.याकाळात त्यांनी विविध पदे भूषविलीत.त्या पदांना न्यायही दिला.भाजपचे प्रदेशाध्यक्ष,अर्थमंत्री,पर्यटनमंत्री,वने सांस्कृतिक,मत्स्यव्यवसाय यासोबत अनेक विभाग ताकदीने सांभाळतांना त्यांना या विभागाला एका उंचीवर नेउन ठेवले.अर्थमंत्री असतांना तर आता माझ्या हातात राज्याच्या तिजोरीची चाबी आहे.याचा पुरेपूर वाफर चंद्रपूरसाठी करण्याचे सांगत ते करून दाखविले.
हाच काय तो “गुन्हा.”……..!
विकासाची अलौकिक दृष्टी असणा-या या नेत्याचे पंख छाटण्याचे काम करण्यात आले.एवढे कर्तव्यदक्ष,एकनिष्ट असतांना केवळ आपल्या नेतृत्वाची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी उमेदवारी मागितली.त्याच्यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी लावून धरली.हाच काय त्यांचा गुन्हा ठरला.हा गुन्हा असेल तर वर्षाणूवर्ष पक्षासाठी झिजणा-यांनी काय करावे असा सुर उमटत आहे.भाजपला बंपर विजय मिळाला.चंद्रपूरातून कधी नव्हे ते भाजपचे पाच आमदार निवडून आले.यामुळे यावेळी भाउंना चांगले खाते मिळेल अशी जिल्हावासियांची,भाजप कार्यकर्त्यांनी अपेक्षा होती.विरोधकांनाही तसच वाटत होत.नागपूरात पार पडलेल्या शपथविधी सोहळयात त्यांचे नाव पक्के आहे.असेही पक्षाकडून सांगण्यात आले.मग वेळेवर असे काय झाले कि,त्यांना डच्चू देण्यात आला.हा प्रश्न आता अनेकांना भेडसावत आहे.त्यांचा अशापदध्दतीने गेम करणारे ते कोण आहेत.याबाबतही आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
तर जिल्हा होईल पोरका
चंद्रपूरच्या राजकीय इतिहासात जेव्हाजेव्हा बाहेरील मंत्रीमहोदयांनी पालकमंत्रीपद सांभाळले तेव्हा तेव्हा जिल्हयाच्या विकासाच वाटोळ झाल.”झेंडा टू झेंडा” असाच उपक्रम राबविण्यात येत होता.पण या पदाचा किती मोठा वापर करता येउ शकतो हे सुधीर मुनगंटीवार,विजय वडेटटीवार या नेत्यांनी दाखवून दिल.आता सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश मंत्रीमंडळात करण्यात आला नाही.त्यामुळ पार्सलच चंद्रूपरचा पालक होणार आहे.अशा स्थितीत पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होउन जिल्हा पोरका होईल अशी भिती आता व्यक्त करण्यात येत आहे.


