
चंद्रपूर:-
नागपूरात आज महायुती सरकारच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.यात अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली.चंद्रपूरात जिल्हयातून तब्बल सात वेळा निवडून आलेले भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद देण्यात आल नाही.त्यांना पक्षाने डच्चू दिला आहे.त्यांना मंत्रीपद न दिल्याने आता जिल्हयातील हजारो कार्यकर्त्यात नाराजीचा सूर आहे.चंद्रपूरच्या वाघाला पक्षाने त्यांच्याच मतदारसंघात कोंडल्याने आता याचीच चर्चा सर्वदूर सुरू आहे.
राज्यात भाजपने बंपर विजय मिळविला.त्यांनी 132 जागा जिंकत आपणच सर्वात मोठा भाउ असल्याचे सिध्द केले.महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर घटकपक्ष शिवसेना व राष्ट्रवादीने मंत्रीपदासाठी जोरदार लांबींग लावली.आप पार पडलेल्या मंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमात भाजपला 19,शिवसेनेच्या 11 तर राष्ट्रवादीला 9 मंत्रीपद मिळालीत.दरम्यान भाजपचे जेष्ठ नेते राज्याचे माजी वने,मत्स्यव्यवसाय व सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नाही.यामुळे आता कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्षपद,अर्थमंत्री पद अतिशय ताकदीने सांभाळणा-या या नेत्यांना का डच्चू देण्यात आला याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.यावेळेच्या मंत्रीमंडळात पुर्व विदर्भाला फारसे काही मिळाले नाही.तब्बल सातव्यांदा आमदार झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी चांगले मंत्रीपद मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती.मात्र त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला नाही.आता याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
कार्यक्रमाला उपस्थिती नाही……!
एकीकडे आज नागपूरात मंत्रीमहोदयांचा शपथविधी पार पडला.अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली.मात्र सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद देण्यात आले नाही.दरम्यान आज पार पडलेल्या शपथविधीच्या कार्यक्रमाला मुनगंटीवार हे अनुपस्थित होते.यामुळे ते नाराज आहेत का याबाबतची चर्चा आता होत आहे.
कारण काय ….. !
चंद्रपूराता अनेकदा बाहेर जिल्हयाचे पालकमंत्री राहिले आहेत.त्यावेळी झेंडा टू झेंडा असाच प्रकार बघालया मिळायचा.पण सुधीर मुनगंटीवार,विजय वडेटटीवार यांच्या रूपाने जिल्हयाला सक्षम नेतृत्व मिळाले होते.त्यांनी परीपरीने पालकमंत्रीपद सांभाळले.पण आता मुनगंटीवारांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचे नेमके कारण काय हा प्रश्न विचारल्या जात आहे.


