
चंद्र्पुर :-
भाजपचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी वने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात आले.एवढया अनुभवी व कार्यक्षम,विकासाची वेगळी दृष्टी असणा-या नेत्यावर अन्याय झाल्याने जिल्हयात नाराजीचा सूर उमटत आहे.आता जिल्हयातील गोंडपिपरीतून याची पहिली रिएक्शन आली आहे.गोंडपिपरी नगरपंचायतीचे भाजपचे गटनेते चेतनसिहं गौर यांनी नगरसेवक तथा शहरअध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.सुधीर मुनगंटीवार यांना न्याय न मिळाल्याने व्यथीत होउन आपण हा निर्णय घेतला असल्याचे गौर यांनी सांगितले आहे.
सुधीर मुनगंटीवार तब्बल सात वेळा ते आमदार होते.पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना जेव्हा जेव्हा जी जबाबदारी दिली तेव्हातेव्हा त्यांनी अतिशय ताकदीने ती पेलली.राज्याचे अर्थमंत्री,भाजपचे प्रदेशाध्यक्ष,वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय व विविध विभागाचे मंत्रीपदाला त्यांनी वेगळी ओळख निर्माण करून आपला ठसा उमटविला.लोकनेते,विकासपुरूष,व चंद्रपूर जिल्हयाचे तारणहार असणा-या सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल नाही.खर तर हा पक्षाचा धक्कादायक निर्णय आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी आमच्यासारख्या हजारो तरूणांना नवी दिशा देण्याच काम केल.भारतीय जनता पक्ष काय आहे हे शिकविल.पण अगदी शपथविधीपूर्वी तुमच नावं आहे.अस सांगण्यात आल.पण प्रत्यक्षात जेव्हा शपथविधी झाला तेव्हा त्यांच नाव वगळण्यात आल.चंद्रपूर जिल्हयावासियांत यामुळ मोठी नाराजी पसरली आहे.सुधीरभाउंसारख्या अतिशय झुंजार नेतृत्वावर झालेला हा अन्याय आमच्या पचनी पडला नाही.या संपूर्ण प्रकारामुळे व्यथित झालेल्या गोंडपिपरी नागरपंचायीचे गटनेते चेतनसिंह गौर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा व भाजपच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व भाजपच्या जिल्हाध्यक्षाकडे पाठविला आहे.


