
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेत बाबुगिरी करायची,चपराशी बनायचे आहे तर एका पदासाठी चाळीस लाख रूपये घेतले जात आहेत.हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचा आरोप चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केला आहे.यासंदर्भात त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय. यामुळे आता पुन्हा एकदा बॅकेची नोकरभरती वादात सापडली आहे.परिक्षेदरम्यान प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने अनेकांच्या परिक्षेचे दिवस बदलविण्यात आले आहेत.चंद्रपूरात संतापलेल्या परीक्षार्थ्यांनी चक्क परिक्षाच बंद पाडल्याचा प्रकार घडला.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक नेहमीच वादाच्या भोव-यात राहिली आहे.गेल्या अनेक वर्षापासून बॅकेची नोकरभरती रखडली होती.शेवटी न्यायालयाच्या आदेशानंतर लिपीकाच्या 261 तर शिपायाचा 97 जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला.यानंतर 358 पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले.याकरिता राज्यभरातून तब्बल 31 हजार 156 उमेदवारांनी अर्ज केले.या पदाकरिता 21 ते 23 डिसेंबर रोजी आॅनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.आजपासून या परिक्षेला सुरवात झाली.दरम्यान या परिक्षेकरिता पूणे,नाशिक,औरंगाबाद,नांदेड जालना असे दुरवरचे केंद्र देण्यात आले.दरम्यान आज परिक्षेच्या पहिल्याच दिवशी कमालीचा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला.एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने उमेदवारांनी तिव्र संताप व्यक्त करित चंद्रपूरात परिक्षा बंद पाडल्याची घटना घडली.
अनेकांनी फिरविली पाठ
बॅकेच्या परिक्षेकरिता अनेक उमेदवारांनी तयारी केली होती.पण हजारो किलोमीटर दुरवर परिक्षा केंद्र दिल्याने अनं परिक्षेसंदर्भात विविध शंका उपस्थित करण्यात आल्याने अनेक उमेदवारांनी परिक्षा न देण्याचा निर्णय घेतला.
काय म्हणाले जोरगेवार……
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅकेत सध्या नोकरभरती घेण्यात येत आहे.यात एका जागेसाठी तब्बल चाळीस लाख रूपये घेण्यात आल्याचा आरोप चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे.त्यांनी आज विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला.हि संपूर्ण भरतीप्रकिया संशयास्पद असल्याचेही त्यांनी विधानसभेत सांगितले.त्यामुळे परिक्षसंदर्भात विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत. बॅकेत बाबुगिरी करण्यासाठी तब्बल चाळीस लाख रुपये मागितले गेल्याचा आरोप आमदार जोरगेवार यांनी केल्यानंतर आता याचीच चर्चा सुरु झाली आहे.


