Monday, October 12, 2026

कर्मवीर कन्नमवार यांच्या नावाने ओळखले जाणार चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय

चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हयाचे सुपूत्र,महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करतांना राज्य सरकारने चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे चौफेर स्वागत करण्यात येत आहे.नुकताच कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचा शतकोत्तर रौप्यजंयती महोत्सव चंद्रपूरात थाटामाटात साजरा करण्यात आला होता.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
कर्मवीर मा.सा.कन्नमवार हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते.त्यांनी दोनदा कॅबीनेट मंत्रीपदही भुषविले.राज्याचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली.नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यलयाला त्यांचे नाव दयावे यासाठी समाजाकडून गेल्या 22 वर्षापासून मागणी करण्यात आली होती.याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.दरम्यान काल उशिरा शासन निर्णय घेण्यात आला.यानुसार आता चंदपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सा कन्नमवार यांचे नाव देण्यात येणार आहे.

समाजाने मानले आभार ….!

दादासाहेबांच्या कार्याची माहिती नवीन पिढीला माहिती व्हावी या करिता संघटनेत काम करणारे आनंदराव अंगलवार, चंद्रशेखर कोटेवार, अरविंद गांगुलवार, रविंद्र बंडीवाऱ,राजेश कात्रटवार , मनीष कन्नमवार, राजेश भांडारवार आनंद कार्लेकर, सचिन चलकलवार विनायक वद्देवार, प्रभाताई चीलके अनिल बोर्गमवार, मुकुंद अडेवार, राजेंद्र बढईये, दीनानाथ वाघमारे मिलिंद बंडीवार , गजानन चंदावार,विजय बोर्गम्मवार सह समाजातील विविध जिल्ह्यातील, कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध संघटनावेळोवेळी केलेले पाठपुरावा यशस्वी झाला.राज्य शासनाच्या या निर्णयाचे आता स्वागत करण्यात येत आहे. समाजाने सरकारचे अभिनंदन केले आहे.

फक्त कागदोपत्री राहु नये
चंद्रपूर जिल्हा स्टेडियम, ज्या विद्यालयात दादासाहेब कन्नमवार शिक्षण घेतले त्या ज्युबीली हाईस्कूल चे नामांतर जाहीर करून १५-२० वर्ष झाले पण अद्यापही फलक लावलेले नाही.यामुळे असे चांगले घेतलेले निर्णय निवड कागदोपत्री राहू नये.यासाठी सरकारने प्रभावी नियोजन करावे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे विचार नविन पिढीला माहिती व्हावे यासाठी सतत कार्य करीत राहणार
आनंदराव अंगलवार
प्रांतीय कार्याध्यक्ष,विदर्भ बेलदार समाज संघटना

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!