Sunday, June 28, 2026
spot_img

“या” बंधूनी दिला “या” अन्यायग्रस्ताला मदतीचा असा हात……! गरिबांना मदत करणाऱ्या चांदेकर कुटुंबातील “त्रिमूर्ती” ची होतेय चर्चा

 

चंद्रपूर

“संवेदना” नावाचा विषय हल्ली दुर्मिळ होऊ लागला आहे. लोक पैशाच्या मागे धावू लागलेत. पण अशाही स्थितीत काही व्यक्तिमत्व सामाजिक भान जोपासतात. समाजासाठी काही देणं आहे याची जाण ठेवतात.अन आपल्या प्रत्यक्ष कार्यातून त्याची अनुभूती देतात.चंद्रपूर जिल्यातील जंगलाच्या कुशीत वसलेल्या चिवंडा गावातील चांदेकर बंधूची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. शून्यातून प्रगतीचे शिखर गाठू बघणाऱ्या या तीन भावंडानी आपल्या कार्यातून अनेकांना मदतीचा हात दिलाय. एका अंध बांधवाच्या वाट्याला आलेल्या करून प्रसंगी त्यांनी दाखविलेली औदार्यता अनेकांना भावून गेली.

घरी अठराविश्व दारिद्र,एकुलती एक मुलगी अपघातात मरण पावली.अशात अंध असलेल्या वडिलांच्या आयुष्यात अंधकाराचे सावट पसरले.आधीच अंध सोबतच अपघातात अनेक अवयव गमविल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले.अशा आणीबाणीच्या स्थितीत नेहमीच सामाजिक कार्यात धाउन जाणारे त्रिमुर्ती भाई भाई एकत्र आले.त्यांनी घनदाट वस्तीत वसलेले कन्हाळगांव गाठले.या गरीब कुटुंबासाठी अन्नधान्य सोबत काही रक्कम देत त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला.या प्रकाराने भारावलेल्या उपस्थितांच्याही डोळयातून अश्रूंची बरसात झाली.

चंद्रपूर जिल्यातील कन्हाळगांव येथील दत्तू संपत मरकाम यांची परिस्थिती अतिशय बिकट.घरी ना शेती ना पिढीजात संपत्ती.उदयाच्या आयुष्याचे स्वप्न रंगविणा-या दत्तूंचे डोळे कायमचे गेले.अनं आता काय करायच या चिंतेन त्यांच्या आयुष्यात अंधकाराचे धुके पसरले.अशावेळी त्यांच्या पत्नी अनं मुलीने त्यांच्यात आशेची नवी पालवी फुलविली.गोंडपिपरी येथील संदीप हाॅटेल येथे त्या कामाला लागल्या.एका कामानिमीत्ताने पंचायत समितीकडे जात असतांना खासदाराचे स्विय सहायकांच्या वाहनाने मुलीला उडविले.यावेळी झालेल्या जोरदार अपघातात मुलीचा मृत्यू झाला.तर अंध पिता गंभीर जखमी झाले.अचानकपणे आलेल्या या संकटाने मरकाम कुटुंबियाला मोठाच धक्का बसला.

नेत्याच्या वाहनाने अपघात होउनदेखिल या गरीब कुटुंबाला मदत देण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही.अपघातात मुलीला गमावल.आधीच अपंग असतांना अपघाताने अनेक अवयवावर परिणाम झाला.यामुळे दत्तू यांचे सामान्य जिवन विस्कळीत झाले.या संपूर्ण प्रकाराची माहिती चिवंडा येथील चांदेकर बंधूना मिळाली.चांदेकर कुटुंबातील तिन बंधूंची ओळख सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द आहे.एका अंध बांधवाच्या वाटयाला आलेल्या करूणकहानीची माहिती कळताच आनंद चांदेकर,विनोद चांदेकर,सुदेश चांदेकर या तिनही बंधूनी पुढाकार घेतला.जिवनापयोगी संपूर्ण सामान घेउन ते कन्हाळगावात पोहचले.यावेळी त्यांनी दत्तू मरकाम यांची भेट घेतली.सामान त्यांच्याकडे सुपूर्द केले.सोबत काही रक्कम दिली.काहीही अडचण आली तर आम्हाला कळवा असा आशावादाचा सुर त्यांनी दत्तू मरकाम यांच्यात निर्माण केला.यावेळी त्रिमुर्ती भाई भाई चे संचालक आनंद चांदेकर,विनोद चांदेकर,सुदेश चांदेकर,उत्कर्ष चांदेकर,मनोज आत्राम,नवनाथ आत्राम,महानंदा मडावी,बजरंग शेडमाके, चैधरी ताई यांच्यासह कन्हाळगावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!