
चंद्रपूर
अगदी काही वेळातच आजोबाच्या गावात जाऊन मजा करायची.तिथून मग यात्रेत जायच अनं मस्त झुल्याबर बसायच.दोन चिमुकल्या भावांच हे स्वप्न क्षणात चकनाचूर झाल.आईवडिलांसह बाईकवर जात असतांना समोरून येणा-या कार ने त्यांना ठोकल अनं होत्याच नव्हत झालं.दिड वर्षाचा चिमुकला जागीच गेला.मोठा भाउ,आई वडिल,गंभीर जखमी झाले.जिल्हा सामान्य रूग्णालयात त्यांना उपचारासाठी भरती केल्या गेलं.तिघेही बेशुध्द अशात आजी आजोबांनी चिमुकल्यावंर अत्यसंकार केले.लहान्याची चिता शांत व्हायच्या आतच मोठया भावाच्या मृत्यूची बातमी समजली अनं सारेच हादरून गेले.त्यांच्या या वेदंनाचा अतिरेक बघून अख्खा गांव रडायला लागला.
विरज दिड तर धिरज पाच वर्षाचा,वडील सुधीर चौधरी आई शिवानी गोंडपिपरीत तालुक्यातील घडोली येथील हा शेतकरी परिवार.सुधीर ची सासुरवाडी आमराई हेटी येथील.आपल्या परिवाराला घेउन सासुरवाडी जात असतांना मधातच यमरूपी कार आली.अंन सारच संपल.विरज जागीच ठार झाला.धिरजही गंभीर जखमी झाला.सुधीर व शिवानी यांचे दोन्ही पाय तूटले,सोबत मेंदूलाही मार लागला.सुधीरचे आईवडील घडोलीत विरजवर अंतीम संस्कार करीत असतांना शिवानीचे आईवडील आपल्या मुली जावई व नातवाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करित होते.विरजवर अंतीम संस्कार झाले.त्याची चिता विझायच्या आतच धिरजाच्या मृत्यूच्या बातमीन ते हादरूनच गेले.घडोलीसह परिसरात या घटनेची माहिती कळाली अनं जो तो शोकाकूल झाला.
मुल कुठ आहेत…मायबापाचा टाहो
सुधीर चौधरी व त्याची पत्नी शिवानी हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले.अपघातानंतर ते बेशुध्दावस्थेत गेले.त्यामुळे काय झाल याचा अदयापही त्यांना पत्ता नाही.अशात आता आपली पोर कुठ आहेत असे विचारत त्यांनी उपचार घेताघेताच टाहो फोडला.त्यांचे दोन्ही मुल अपघातात गेली हे त्यांना समजले तर त्यांच काय होईल या भितीन नातेवाईक देखील हि बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवीत आहेत.
काय गुन्हा होता…..!
भरधाव वेगात येणा-या कारने सुधीर चालवित असलेल्या बाईकला उडविल अन अख्खा परिवारावर संकटाच आभाळ कोसळल.दोन गोंडस मुलांचा काय गुन्हा होता कि त्यांना आपला जिव गमवावा लागला.पोलीस प्रशासनाने आता कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी चालविली आहे.पण त्याने धिरज व विरज ला परत आणतील का असा संतप्त सवाल सर्वत्र विचारल्या जात आहे.
अशी कशी असंवेदनशीलता
एका गरीब शेतकरी कुटुंबातील दोन चिमुकल्या भावांचे जीव गेले. त्यांचे आईवडील मृत्यूशय्येवर आहेत.या घटनेने समाजमनाला सुन्न करून सोडले. सारेच या दुर्दैवी घटनेमूळ हळहळ व्यक्त करीत आहेत. अशा स्थितीत लोकप्रतिनिधीना काही देण घेणं आहे की नाही हा प्रश्न आता समोर येत आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यांनी यावेळी संवेदना दाखविली. कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.सुधीर चौधरी हे युवा शेतकरी आहेत. माहितीनुसार त्यांना कुठलेही व्यसन नाही. अशात कार चालकाच्या चुकीने संपूर्ण कुटुंबावर आता संकटाचे आभाळ कोसळले आहे.


