
चंद्रपूर:-
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांनी दणदणीत कामगिरी केली.ंिशवसेनेच्या शिंदे गटानेही आपले अस्तित्व दाखविले.चंद्रपूरात शिवसेनेच्या शिंदे गटाची फारशी ताकद नाही.पण आता आपली ताकद वाढविण्यासाठी शिंदे गट सरसावला आहे.अनेकांचे पक्षप्रवेश,विविध उपक्रमांचे आयोजन करित ते पक्ष वाढविण्यासाठी नियोजन करित आहेत.बंडू हजारे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.आता तेही कमालीचे अलर्ट झोनवर आहेत.त्यांच्यासाथीला उपजिल्हाप्रमुख नितीन धानोरकर यांनी आता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.
अनेकांचा पक्षप्रवेश
शिंदे गट चंद्रपूर जिल्हयात आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नंाची पराकाष्ठा करीत आहे.चंद्रपूरातील गोंडपिपरी येथे गेल्या काही दिवसात अनेकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत.अशात आता प्रस्थापीत पक्षातील अनेक असंतुष्ट सोबतच अनेक युवा कार्यकर्ते शिंदे गटासोबत जुळत आहेत.ग्रामीण भागात नितीन धानोरकर या युवा नेत्याने आता यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.
ग्राउंडवर फिल्डींग
शिंदे गटाला अदयापही ग्रामीण भागात पोहचता आले नाही.अशात या भागावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आता नेत्यांनी काम करणे सुरू केले आहे.गावागावातील नागरिकांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविणे सुरू केले आहे.बंडू हजारे हे चंद्रपूरातील लाठी या गावचे भूमिपूत्र आहेत.त्यांनी आता याच भागात विविध कार्यक्रमांची मालीका चालविली आहे.येथूनच नवीन उमेदीने पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकले आहेत.शिंदे गटाला चंद्रपूरात नवी उभारी देण्यासाठी आता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.



