
गडचिरोली
‘दंडकारण्य’ हा विषय आला कि आजही अनेकांचे हात कापतात.पण गडचिरोली जिल्हयातील पोलीस जवान आपल्या जिवाची बाजी लावून तिथे काम करतात.क्षणोक्षणी मरणाची भिती.पण ते कधी ना डगमगतात,नाही माघार घेतात.भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात सी 60 दलात काम करणारे पोलीस अंमलदार महेश नागूलवार यांनी नक्षली तळ उध्दस्त करतांना आपल्या प्राणाची आहूती दिली.क्षणभरात हि माहिती सर्वत्र पसरली अनं मग त्यांच्या वीर मरणाने चौफेर वेदनांची बरसात झाली.गडचिरोलीचा सुपूत्र,अनखोडयाचा भुमिपूत्र महेश यांच्या या त्यागाने व्यथीत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक भावनात्मक पोस्ट करित महेश यांना श्रध्दांजली वाहिली.
पोलीस बनायच पण गडचिरोली नको रे बाबा असाच अनेकांचा कल आहे.पण आजही येथील भुमिपूत्र आपल्याच जिल्हयात जिवावर बेतून काम करतात.महेश चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील.घरची परिस्थिती अतिशय बेताचीच.पण याही स्थितीत त्यांनी पोलीस बनायच स्वप्न बघितल.प्रचंड मेहनत घेतली.अभ्यास केला.अनं 2012 च्या भरतीत तो पोलीस म्हणून गडचिरोलीत दाखल झाला.त्याने घेतलेली मेहनत अनं इतंरापेक्षा वेगळेपणाची भुमिका यातून महेश गडचिरोलीच्या नक्षविरोधी अभियानात दाखल झाला.सी -60 पथकात त्यांची निवड झाली.
महेश चामोर्शी तालुक्यातील अनखोडा या गावचा निवासी.आईवडिलांचा हा एकुलता एक लेक पोलीसात गेल्याचा आंनद असतांना गडचिरोलीच्या दुर्गम भागात काम करतांना कधी काय होइल याची त्यांनाही भिती होती.अशातच काही वषापूर्वी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले.या सर्व परिस्थीतीवर मात करून अतिशय कर्तव्यदक्षतेने काम करणारा आपला मित्र हरपला.शहीद झाला यावर अजूनही अनखोडावासियांचा विश्वास नाही.अनेक मित्र महेश यांना म्हणायचे कि तू आता सी -60 तून पोलीस दलात दाखल हो.पण महेशने आपल्या कर्तव्यात कधीही कसूर होउ दिला नाही.सी -60 च्या तूकडयात त्यांची कामगिरी अतिशय दखलपात्र राहिली.
देवेंद्र फडणवीसांनी अशा केला भावना व्यक्त
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांचा तळ आमच्या सी-60 च्या बहाद्दर जवानांनी उदध्वस्त केला आहे. मात्र दुर्दैवाने या कारवाईत सी-60 पथकातील पोलिस अंमलदार महेश कवडू नागुलवार हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून गडचिरोलीतील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रयत्नांची शर्थ करुनही त्यांना वीरमरण प्राप्त झाले. नक्षलमुक्त भारताच्या अभियानात त्यांनी राष्ट्रासाठी दिलेली आहुती आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
पोलिस अधीक्षकांशी मी स्वत: बोललो आहे. महाराष्ट्र पोलिस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. महेश कवडू नागुलवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत आणि विविध लाभांसह 2 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात


