
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र काॅग्रेस पुर्णत बॅकफुटवर आली.यानंतर आता पक्षात मोठे बदल केले गेले आहेत.राहूल गांधी यांच्या विश्वासातील हर्षवर्धन सपकाळ यांना काॅग्रेसने राज्याची कमाल सोपविली आहे.जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनाही पक्षाने मोठे स्थान दिले आहे.वडेटटीवार यांच्याकडे विधीमंडळ पक्षनेते पद सोपविण्यात आले आहे.यापुर्वी हे पद बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते.
हर्षवर्धन पकाळ हे बुलढाण्याचे माजी आमदार आहेत.ते जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते.राहूल गांधी यांच्या टीम महाराष्ट्रमधील ते अतिशय महत्वाचे सदस्य होते.विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसचा झालेला दणदणीत पराभव पक्षाच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे.काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पराभवाचे खापर फोडल्या गेले.यामुळे त्यांचे पद जाईल हे निश्चीत होते.पटोलेनंतर प्रदेशाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी कोणाकडे जाते याकडे राजकीय वर्तुळात लक्ष होते.
पण हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्क्षपदाची जबाबदारी देत पक्षाने अनेकांना चांगलाच धक्का दिलाय.
दुसरीकडे विधानसभा गटनेते पद भुषविणारे विजय वडेट्टीवार यांनाही अतिशय महत्वाचे पद देण्यात आले आहे.त्यांना विधीमंडळ पक्षनेतेपद देत त्यांची जबाबदारी वाढविण्यात आली आहे.विजय वडेट्टीवार यांचा राजकीय प्रवास अतिशय खरतळ राहिला आहे.चंद्रपूरातील करंजी पासून त्यांनी सुरू केलेला आपल्या जिवनाचा प्रवास राज्याच्या केंद्रबिंदू पर्यत आला आहे.विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसचे पाणीपत झाले.अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाचे तोंड बघावे लागले.पण अशा स्थितीतही विजय वडेटटीवार यांनी आपल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विजयाचा पताका रोवला.आता हर्षवर्धन सपकाळ व विजय वडेटटीवार यांच्या टीम समोर काँग्रेसची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान आहे.


