Sunday, June 28, 2026
spot_img

तिकीट नाकारले,पण यांनी निवडणूक लढवून केली दमदार कामगिरी..                         आता मारली शिंदे गटात एन्ट्री

चंद्रपूर:-

वरोरा – भद्रावती हा विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.अशात यावेळच्या निवडणुकीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाला समझोता करावा लागला.महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार प्रतीभा धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे यांना काॅग्रेसने उमेदवारी दिली.आपल्या हक्काची तिकीट पक्षाने नाकारल्याने नाराज झालेल्या उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुकेश जिवतोडे यांनी उमेदवारी दाखल केली.अनं आपली ताकद दाखवून दिली.पन्नास हजार मत घेतली.त्यांनी केलेली हि कामगिरी बघता पक्षाने पुन्हा एकदा त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले.पण आता मुकेश जिवतोडे यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली.त्यांच्या एन्ट्रीने आता चंद्रपुरात शिंदे गटाला चांगले बळ मिळणार आहे.उध्दव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसतांना चंद्रपूरात मिळालेला हा धक्का वेदनादायी असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मोठे यश मिळाले.यानंतर विधानसभा निवडणुकीत त्याचा सकारात्मक परिणाम होईल अंन आपलीच सत्ता येईल हि अपेक्षा महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना होती.पण निकाल आले.अनं सा-यांचेच गणीत चुकले.भाजपने अशी मुसंडी मारली कि,त्यांच्या मित्रपक्षांनाही धक्का बसला.देंवेद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदी नाईलाजाने समाधान मानावे लागले.
या सत्तांतरानंतर आता शिवसेना उबाठा ला अनेक धक्के बसले आहेत.महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान केला.त्यांचे तोंडभरून कौतूकही केले.यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले.पवारांच्या या भुमिकेबाबत शिवसेना आक्रमक झाली.गद्दारांना पुरस्कार दिला म्हणून संजय राउत यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उडविली.

पण मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यत आता उध्दवसेनेला झटकेच बसत आहेत.परवा साळवी अनं चंद्रपुरातील मुकेश जिवतोडे यांनी शिंदे गटाची साथ पकडली.पक्षप्रवेशही थाटात झाला.स्वत: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशाने आता चंद्रपुरात तरी शिंदे गटाची ताकद वाढणार आहे असे बोलल्या जात आहे.

मुकेश जिवतोडे हे कटटर शिवसैनिक.चंद्रपुरातील वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला.पण महाविकास आघाडीच्या पारडयातून याठिकाणची उमेदवारी हि काॅग्रेसला दिल्या गेली.खासदार प्रतीभा धानोरकर यांचे बंधू प्रविण काकडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते.आपल्या हक्काची तिकीट कापल्या गेल्याचे दुखः विसरून मुकेश जिवतोडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.जवळपास पन्नास हजार मत घेत त्यांनी आपली ताकद दाखवली.शिवसेनेने कशी चुक केली हे ही स्पष्ट झाले.प्रविण काकडे यांचा दणदणीत पराभव झाला.

निवडणुकीत बंडखोरी करणा-यांना पक्षाकडून कारवाई करण्यात येते.पण उध्दव गटाने पुन्हा जिवतोंडेना जिल्हाध्यक्षापदी विराजमान केले.पण पक्षाने तिकीट नाकारली.अधिकृत उमेदवारी मिळाली असती तर आपलाच विजय झाला असता.हि सल मात्र त्यांच्यात कायम असल्याने शेवटी मुकेश जिवतोडे यांनी शिंदेच्या गटात एन्ट्री मारली.

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!