
चंद्रपूर:-
चंद्रपूर बसस्थानकाकरिता एसटी महामंडळाच्या पाच नव्याको-या बसेेस दाखल झाल्या.आता त्याचे रितसर उदघाटन करायचे होते.राज्याचे माजी वने सांस्कृतिक मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरच्या बसस्थानकावर पोहचले.त्यांनी रिबीन कापून नव्या एसटी ला हिरवी झेंडी दाखविली.चंद्रपूरच्या बसस्थानकावर हा कार्यक्रम होतो न होतो तोच महाकाली यात्रेनिमीत्त आमदार किशोर जोरगेवार देखिल एसटी बसेसच्या उदघाटनात रमले.बसमधून त्यांनी प्रवासही केला.पण या दोन वेगवेगळया कार्यक्रमाने आता मुनगंटीवार,जोरगेवारांत सुरू असलेल्या श्रेयवादयाच्या लढाईत पुन्हा एकदा भर पडली.मागील दिवसात जोरगेवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रपूरात बोलविले होते.यावेळी मुनगंटीवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता.आता नव्या एसटीच्या निमीत्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील वितुष्ट कमालीचे टोकाला पोहचल्याचे चित्र आहे.या दोघांच्या श्रेयवादाच्या लढाईनंतर आता चंदपूर बिजेपीत
ये क्या हो रहा हे,भाई ये क्या हो रहा है असा सवाल विचारल्या जात आहे.
सुधीर मुनगंटीवार अनं किशोर जोरगेवार हे तर कधीकाळी एकमेकांचे सहकारी होते.पण आता स्थिती बदलली आहे.जोरगेवार चंद्रपूरचे प्रतिनीधीत्व करतात.लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत पराभव झाला होता.निवडणुकीच्या दोन दिवसांअगोदर जोरगेवारांनी मुनगंटीवारांना समर्थन देण्याचे जाहीर केले होते.यांनतर दोघांनीही हातात हात दिला.यामुळे या दोघांतील वितुष्ट संपल्याची चर्चा झाली.पण विधानसभा निवडणुकीत मात्र पुन्हा त्यांच्यात तुलगीकरा पेटला.मुनगंटीवारांनी पाझारेंच्या उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावली.पण जोरगेवारांनी बाजी मारली.भाजपत प्रवेश करित उमेदवारी मिळविली.अनं विजयाचा पताकाही रोवला.यानंतर मात्र दोघांचेही राजकीय संबध खूप ताणले गेले.दरम्यानच्या काळात विविध घटनाक्रमांनतर या दोन नेत्यांत श्रेयवादाची लढाई रंगली.
आता पुन्हा एसटीच्या मुदयावरून त्यांच्याच पेटलेल राजकीय रणकंदन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
अधिकाऱ्यांचाही दमछाक
महामडंळाच्या पाच बसेस दाखल झाल्यानंतर या उदघाटनाचा एकच कार्यक्रम होणे अपेक्षित होते.मात्र तसे झाले नाही.सुधीर मुनगंटीवार यांनी बसस्थानकात कार्यक्रम घेताच जेारगेवारांनीही उदघाटन केले.या सा-या भानगडीत मात्र एस टी महामंडळाच्या अधिका-याची चांगलीच दमछाक झाली.


