Sunday, October 11, 2026

‘‘ये’’ रिश्ता क्या कहलाता है…….! विजय वडेट्टीवार आशिष शेलारांच्या भेटीचे रहस्य काय ?

चंद्रपूर
काॅग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार भाजपत जाणार हा काही नवा विषय नाही.अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी वडेट्टीवार लवकरच भाजपवासी होणार असे वक्तव्य केले होते.पण वडेट्टीवारांनी अतिशय आक्रमपणे त्यांना उत्तर दिलीत.मात्र नुकत्याच एका घटनाक्रमानंतर पुन्हा आता वडेट्टीवारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.अनं यासाठी कारणनिमीत्त ठरलयं ते भाजप नेते अनं राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासोबत नागभीड ते मूल चा त्यांनी केलेला प्रवास अनं नंतर आपल्या इथेनाल प्रोेजेक्ट साईटवर केलेली बंदव्दार दिर्घ चर्चा.

चंद्रपूरात मागील महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आमदार किशोर जोरगेवार यांनी विजय वडेट्टीवारांना पक्षात येण्याचे आवाहन केले होते.मंत्रीमंडळात एक मंत्रीपद खाली आहे.ते तुमच्यासाठीच आहेे अशी टिप्पणीही त्यांनी जोडली होती.यानंतर हा मुद्दा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चीला गेला होता.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नुकताच चंद्रपूरचा दौरा केला.या दौ-यादरम्यान नागपूरातून चंद्रपूरला येत असतांना ते नागभीड येथे थांबले होते.चिमुरचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया हे आधीच तिथे होते.याचदरम्यान काॅग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपले वाहन सोडून शेलार आणी भांगडीया यांच्या वाहनातून सोबत प्रवास केला.एवढेच नव्हे तर आपल्या इथेनाल प्रोेजेक्ट साईटवर या तिघांत बरीच चर्चा रंगली होती.

आता हि माहिती समोर येताच विविध राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत.आपल्या रक्तात काॅग्रेस आहे.आपण पक्ष बदलविणार नाही असे वडेट्टीवारांकडून वारंवार सांगितले जाते.पण या चर्चेचे रहस्य नेमके काय.वडेट्टीवार भाजपत जर जाणार नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहेत.मंत्रीमंडळात अजूनही एक पद खाली आहे.मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता हि संख्या दोनवर पोहचली आहे.अशात वडेट्टीवारांना भाजपत प्रवेश देत त्यांना शक्तीशाली मंत्रीपद म्हणून बक्षिस देण्यात येणार का असेही आता बोलले जात आहे.

एकाच वाहनातून बराच प्रवास करणा-या या नेत्यांत नेमक काय गुप्तगू झाल याबाबतची माहिती समोर आली नाही.मात्र हा निवळ योगायोग होउ शकत नाही असं राजकीय वर्तुळातील जाणकारांच म्हणण आहे.विजय वडेट्टीवार यांनी नेहमीप्रमाणे या चर्चांना फेटाळून लावले आहे.पण आता चंद्रपूरसह राज्याच्या राजकारणात हा विषय चांगलाच चर्चीला जात आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!