Sunday, October 11, 2026

गडचिरोलीतील अतिदुर्गम गावातील नागरिकांनी “या” खासदारांचे केले जंगी स्वागत

गडचिरोली

गर्भवती महिलेला रस्ता पार करण्यासाठी जेसीबीच्या बकेटमध्ये बसविण्यात आल्याचा प्रकार असो वा मुलाला उपचारासाठी पाठीवर घेउन अनेक किलोमीटरचा पायदळी प्रवास अशा अनेक धक्कादायक घटनांनी गडचिरोलीच्या अतिदुर्गभ गावातील अनेकांच्या वेदना समोर आल्या.आजही अनेक गावातील परिस्थिती भिषण,भयावह आहे.आरोग्य,रस्ते,शिक्षण व रोजगाराच्या समस्यांनी गरीब आदिवासी बांधव हैराण असंताना याकडे ना प्रशासनाने लक्ष आहे.ना लोकप्रतिनिधींचे. अशात गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम भागातील गटटा जांबिया या गावात अचानक खासदार महोदय आपल्या ताफ्यासह पोहचले अनं गावकरीही दंग राहिले.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखादी खासदार गावात आल्याने त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.सोबत आपल्या व्यथा वेदनाही त्यांच्यापुढे मांडल्या.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डाॅ.नामदेव किरसान अधिक गतीने आपले काम करित आहेत.संसदेत बेधडकपणे प्रश्न मांडणारे किरसान गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात जात सामान्य नागरिकांच्या व्यथा,वेदना जाणून घेत आहेत.प्रशासनाच्या कामकाजाचा प्रचंड अनुभव आता लोकप्रतिनीधीच्या रूपाने आयुध म्हणून ते वापरीत आहेत.नुकतीच त्यांनी गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गट्टा,जांबिया या गावांना भेट दिली.नागरिकाशी संवाद साधला,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.सोबतच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील अधिका-यांना निर्देशही दिलेत.

उच्चविद्याविभुषीत व प्रशासनात मोठया हुददयावर काम करणारे डाॅ.नामदेव किरसान यांनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाची निवडणुक लढविली.अनं ते विजयी देखील झाले.काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या संपूर्ण टिमने त्यांच्या विजयासाठी कंबर कसली.काॅग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी किरसान यांच्या विजयाचा विडा उचलला होता.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर डाॅ.किरसान यांनी संसदेत अनेक प्रश्न बेधडकपणे मांडले.काॅग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करतांना त्यांनी गडचिरोली जिल्हा पिंजुन काढला होता.आता खासदार झाल्यानंतर देखील ते जिल्हयातील अतिदुर्गम गावांना भेटी देत आहेत.तेथील आदिवासी बांधवांचे प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करित आहेत.

खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना,”दुर्गम भागातील जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवा,” असे निर्देश दिले.
या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि प सदस्य सैनू गोटा, रजनीकांत मोटघरे,रमेश गंपवार, निजाम पेंदाम, लोकेश गावडे, प्रज्वल नागूलवार, सचिन मोतकूलवार, शिलूताई गोटा, सतीश मुप्पलवार, जगदीश मेश्राम, सुरज जक्कुलवार, बंटी जुनघरे, स्वप्नील मडावी, कन्नाजी गोटा, संजय गिरे, रवी अलोणे, रामदास उसेंडी, विष्णू हिचामी, बंडू हेडो, प्रभाकर दुर्गे, प्रमोद देवतळे तसेच गट्टा-जांभिया परिसरातील ग्रामसभेचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावकऱ्यांनी खासदारांच्या या दौऱ्याचे स्वागत करत ही ऐतिहासिक भेट ठरल्याचे सांगितले. “खासदार स्वतः येऊन आमचं ऐकतात हेच आमच्यासाठी मोठं आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!